मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यास सोयी पुरवा
By Admin | Updated: August 7, 2015 01:37 IST2015-08-07T01:37:43+5:302015-08-07T01:37:43+5:30
ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या गरीब गरजू आदिवासी मुलींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, ...

मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यास सोयी पुरवा
अप्पर आयुक्त खोडे : मुलींच्या वसतिगृहाला भेट
सालेकसा : ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या गरीब गरजू आदिवासी मुलींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्व सोयी सुविधा मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आदिवासी विभाग नागपूरच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी केले. त्यांनी सालेकसा येथील मुलींच्या वसतिगृहाला बुधवारी भेट दिल्यानंतर हे मनोगत व्यक्त केले.
भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या डॉ.माधवी खोडे यांना आदिवासी विभाग नागपूरचे अप्पर आयुक्त पदावर काम करण्याची संधी लाभली आहे. त्यांनी सालेकसा येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाला अचानक भेट दिली आणि येथे मुलींना मिळणाऱ्या सोयी सुविधांबद्दल पाहणी करीत विस्तृत माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रकल्प अधिकारी गिरीश सरोदे व इतर अधिकारी, कर्मचारी सुध्दा उपस्थित नहोते. सालेकसा येथे प्रथम आगमन झाल्यावर आदिवासी एम्प्लॉईज व पिपल्स फेडरेशनतर्फे त्यांचो पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात आदिवासी शिक्षक नेते राधेश्याम टेकाम, जि.प. सदस्य विजय टेकाम, माजी जि.प. सदस्य रामेश्वर पंधरे, रमनलाल सलाम, जगदिश मडावी,संतोष उईके, मधुकर उईके, राजेश भोयर, अरविंद सोयाम, शंकर लटये, नोहरलाल नाईक व विद्यार्थी उपस्थित होते.