पदोन्नतीपर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:01 IST2019-02-21T23:00:10+5:302019-02-21T23:01:04+5:30
जिल्हा पोलीस विभागात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपर स्टार लावून पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. ६ पोलीस हवालदार, ८ पोलीस नाईक, १० पोलीस शिपायांचा यात समावेश आहे.

पदोन्नतीपर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा पोलीस विभागात कार्यरत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपर स्टार लावून पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. ६ पोलीस हवालदार, ८ पोलीस नाईक, १० पोलीस शिपायांचा यात समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात बुधवारी (दि.२०) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात सर्व पदोन्नती मिळालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक हरिष बैजल व गृह उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या हस्ते स्टार व फित लावण्यात आले.
या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गौरव कार्यक्र माच्या माध्यमातून इतर पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांनीही चांगले कार्य करुन स्टार मिळविण्यासाठी प्रोत्साहन मिळावे. यासाठीच हा कार्यक्रम आयोजित केल्याचे हरिष बैजल यांनी सांगितले. या वेळी पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर नत्थू मेश्राम, कमलसिंग सुर्यवंशी, मोतीराम मरसकोल्हे, खुशाल भस्मे, प्रितमलाल सुरसावंत व फलेंद्र गिरी यांचा समावेश आहे. पोलीस नाईक ते पोलीस हवालदार पदावर बालाजी कोकोडे, ज्ञानेश्वर औरासे, नरेशकुमार साखरे, दशरथ मसराम, धर्मेंद्र परतेकी, रमेश बिसेन, प्रतिभा राऊत, विलास घोरमारे यांचा समावेश आहे. तर पोलीस शिपाई ते पोलीस नाईक पदावर हरगोविंद उके, तुरषा लिल्हारे, सुनीलकुमार कोहळे, मकरंद मोहिते, सरोज घरडे, आशिषकुमार अग्निहोत्री, पंकज सव्वालाखे, गुलाबदास तुरकर, पुस्तकला बिसेन, संजयकुमार बेलपांडे यांचा समावेश आहे.
या सर्व पदोन्नती झालेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना एक वेतन वाढ अधिक मिळणार आहे. तसेच तपासामध्ये सुध्दा अधिकचे अधिकार मिळाले आहेत. कार्यक्र माला पोलीस निरीक्षक चांदा, पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारनवरे यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.