शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

आंबेनाला प्रकल्प लवकरच पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 9:18 PM

आजपर्यंत ज्या ज्या कामामध्ये हात घातले ते ते काम यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. भुराटोला लघू पाटबंधारे प्रकल्पामुळे ४८९ हेक्टर शेतीला सिंचन होईल. याचे काही काम पूर्ण झाले असून निधीअभावी काही काम रखडले होते.

ठळक मुद्दे१३ कोटी ८० लाख मंजूर : भुराटोला लघू प्रकल्पाचे काम जून २०१८ पर्यंत होणार पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : आजपर्यंत ज्या ज्या कामामध्ये हात घातले ते ते काम यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. भुराटोला लघू पाटबंधारे प्रकल्पामुळे ४८९ हेक्टर शेतीला सिंचन होईल. याचे काही काम पूर्ण झाले असून निधीअभावी काही काम रखडले होते. सततचा पाठपुरावा व कार्यकारी अभियंता फाडके यांच्या सहकार्याने भुराटोला लघू प्रकल्पाचे काम जून २०१८ पर्यंत पूर्ण होईल. तसेच ४० वर्षांपासून रखडलेला आंबेनाला प्रकल्प सुध्दा लवकरच पूर्ण होईल, असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी रविवारी (दि.१४) येथे प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी केले.महाराष्टÑ शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत, विदर्भ पाटबंधारे विभाग महामंडळ नागपूरमधील भुराटोला लघू पाटबंधारे प्रकल्प तालुका तिरोडाचे भूमिपूजन आ. रहांगडाले यांच्या हस्ते, माजी आ. भजनदास वैद्य यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, माजी जि.प. उपाध्यक्ष मदन पटले, कार्यकारी अभियंता पृथ्वीराज फाडके, सरपंच कमलेश आतीलकर, प्रकाश भोंगाडे, जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर, पं.स. सदस्य पवन पटले, कृउबासचे सदस्य तेजराम चव्हाण, चतुर्भूज बिसेन, मिलिंद कुंभरे, उपसरपंच बाबू कटरे उपस्थित होते.आ. रहांगडाले म्हणाले, या प्रकल्पामुळे शेतकºयांना शेतीसाठी पाणी मिळेल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. प्रकल्पाच्या कामासाठी ग्रामपंचायतची एनओसी लागत होती. ती पं.स. सदस्य पवन पटले तसेच सरपंचांनी तत्काळ मिळवून दिली. हा आपल्या तालुक्यातील पहिलाच प्रकल्प आहे की ज्याचे पाणी शेतीला कॅनलद्वारे न जाता पाईपने जाईल, तेही जमिनीच्या ३ फूट खालून. त्यामुळे शेती, जमीन जाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. प्रत्येक शेतकºयासाठी व्हॉलची व्यवस्था असणार आहे. धापेवाडा प्रकल्पाला १५ वर्षांपासून गती नव्हती. हा प्रकल्प २००४- ०५ मध्येच पूर्ण झाला असता तर आता दुष्काळ पडला नसता, असे ते म्हणाले.प्रास्ताविकातून उपकार्यकारी अभियंता के.एस. मुनगनिवार यांनी, हा प्रकल्प निधीअभावी रखडला होता. परंतु आ. रहांगडाले यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला असून जून १८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. कार्यकारी अभियंता फाडके यांनी या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यास आ. रहांगडाले यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. पंचायत समिती सदस्य पवन पटले यांनी शेतकºयांना शेती अधिग्रहण करताना नुकसानभरपाई कमी मिळाली, ते मिळवून देवू असे सांगितले. नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी, ४० वर्षे जुनी पाणी पुरवठा योजना तिरोडावासीयांना पुरेशी नव्हती. आता नवीन २७ कोटी रुपयांची योजना मंजूर करवून दिली. आम्ही एक पाऊल समोर टाकतो तर आ. विजय रहांगडाले आम्हाला १०० पावले पुढे नेतात, असे सांगितले. डॉ. चिंतामन रहांगडाले यांनी भुराटोला, आंबेनाला, धापेवाडा टप्पा-२ यामुळे तालुक्यात हरितक्रांती येणार असल्याचे सांगितले. मदन पटले यांनी या प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे परिसरातील शेतकरी समृद्ध होतील, असे सांगितले. माजी आ. भजनदास वैद्य यांनी या प्रकल्पामुळे करटी, करटी खुर्द, पालडोंगरी, भुराटोला या गावाला पाण्याची समस्या भेडसावणार नसून येथील शेतकरी समृद्ध होतील, असे सांगितले.शेवटी या गावातील जनतेच्या सोईच्या दृष्टीने दहा लाखांचा एक रस्ता तसेच तीन-तीन लाखांचे दोन रस्ते मंज़ूर केल्याचे आ. रहांगडाले यांनी आभार व्यक्त करताना घनशाम पारधी यांना सांगण्यास सांगितले.याप्रसंगी मंचावर डॉ. वसंत भगत, सरपंच संगीता पुराम, भाजपा तालुका अध्यक्ष भाऊराव कठाणे, उमाकांत हारोडे, सलाम शेख, सरपंच सुधा घरजारे, पोलीस पाटील अरविंद चौरे, सुकचंद रहांगडाले, जितेंद्र रहांगडाले, तेजराम चव्हाण, पांडुरंग टेकाम, प्रकाश गौतम, योगेश्वर रहांगडाले, धीरज बरियेकर, निलेश बावनथडे, मुकेश पटले प्रामुख्याने उपस्थित होते.संचालन डुलेश रहांगडाले यांनी केले. आभार घनशाम पारधी यांनी मानले. कार्यक्रमासाठी एच.ए. गायकवाड, एम.बी. कदम, कर्मचारी, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य केले....अन्यथा राजीनामा घ्या!खळबंदा जलाशयात १८ किमीची पाईपलाईन पूर्ण करुन पाणी सोडले आहे. धापेवाडाच्या टप्पा २ चे पाणी चोरखमारा व बोदलकसा जलाशयात २०१९ मध्ये सोडल्याशिवाय राहणार नाही. ४० वर्षांपासून रखडलेला आंबेनाला प्रकल्प पूर्ण होणार असून त्यासाठी मुख्यमंत्र्याकडे गेलो होतो. त्यांच्याकडे यासाठी उपोषण करण्याची परवानगी द्या अथवा माझा राजीनामा स्वीकारा, असे कळकळीने सांगितले होते. हा प्रकल्प न झाल्यास मला पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे सांगितल्यावर दुसºयाच दिवशी मुख्यमंत्र्यांनी १३ कोटी ८० लाखांचा निधी मंत्रिमंडळात मंजूर करुन मला बोलावून स्वत: सांगितले. तर दुसरीकडे मोठे नेते या प्रकल्पासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे सांगतात, असा टोमणाही यावेळी आमदार विजय रहांगडाले यांनी मारला.