लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:16 IST2017-09-15T22:16:06+5:302017-09-15T22:16:31+5:30

नवेगावबांध राष्ट्रीय पर्यटन संकुल परिसराचा विकास आराखडा डिसेंबर २०१७ पर्यंत मंजूर करुन विकास कामांना गती द्यावी.

Prohibition of Representatives | लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी करणार

लोकप्रतिनिधींना प्रवेशबंदी करणार

ठळक मुद्देनवेगावबांध फाऊन्डेशनचा इशारा : राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध विकास आराखड्याला गती द्या

अमरचंद ठवरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : नवेगावबांध राष्ट्रीय पर्यटन संकुल परिसराचा विकास आराखडा डिसेंबर २०१७ पर्यंत मंजूर करुन विकास कामांना गती द्यावी. अन्यथा सत्ताधारी लोकप्रतिनिधींना नवेगावबांध व पर्यटन संकुल परिसरात प्रवेशबंदी करण्यात येईल, असा निर्वाणीचा इशारा नवेगावबांध फाऊन्डेशनच्या वतीने देण्यात आला.
राष्ट्रीय उद्यान म्हणून अख्या राज्यात नावारूपास असलेल्या नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाला आता उतरती कळा लागली आहे. पर्यटकांना आकर्षित करणाºया सोयीसुविधांचा अभाव जाणवत आहे. एकेकाळी वैभव प्राप्त असलेल्या राष्ट्रीय उद्यानाला घर-घर लागली असून गतवैभव प्राप्तीसाठी बोलक्या सुधारकांपेक्षा कर्त्या सुधारकांची आज गरज आहे.
जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना नवेगावबांध फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, २० जुलै २०१७ रोजी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रीय उद्यानातील लॉगहट विश्रामगृहात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुल परिसराच्या विकासासंदर्भात बैठक घेतली होती. सदर बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा पर्यटन समिती, वनविभाग, महसूल, वन्यजीव संरक्षण, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, आदि विभागाचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
पर्यटन संकुल परिसरातील ज्या भागाचा विकास करावयाचा आहे, त्या भागाची प्रत्यक्षात पाहणी पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाºयांसह केली.
बैठकीमध्ये थायलंडप्रमाणे वन्यजीव संरक्षण विभागाच्या अनुसूची क्रमांक १ ते ५ मधील वन्यप्राणी वगळून अन्य प्राण्यांचे प्राणी संग्रहालय उभारणे, शेगावच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारणे, प्रवेशद्वारापासून ते संकुल परिसरात दुतर्फा शोभिवंत वृक्षांची लागवड करणे, गाव तिथे क्रीडांगण योजनेतून विशेष बाब म्हणून क्रीडांगण तयार करणे, हनुमान मंदिराच्या पायथ्याशी जलतरण तलाव, संजय कुटी परिसरात ३ किमीची मिनी ट्रेन तयार करणे, खोली पहाडी ते जे.टी. पार्इंट पर्वत रोपवे तयार करणे, मनोहर उद्यान, हिल टॉप गार्डन, वैभव गार्डन, हॉलीडे होम्स गार्डनचे नुतनीकरण व सुशोभिकरण करणे, बालोद्यानात आकर्षक खेळणी बसविणे, ५० लाखांच्या खर्चातून तयार करण्यात आलेल्या व सद्यस्थितीमध्ये दैनावस्थेत असलेल्या रॉक गार्डन व कॉन्फरन्स हॉलचे पुनरुज्जीवन करणे इत्यादी बाबींचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाºयांना बैठकीत दिले होते.
विकास आराखडा तयार करताना स्थानिक संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले होते. सदर बैठक होऊन दोन महिन्यांचा काळ लोेटला असला तरी बैठकीमधील विषयाला गती येवून दिशा मिळालेली दिसत नाही. संबंधित एकाही विभागाने पर्यटन संकुल परिसराचा विकास आराखडा तयार करण्याची तत्परता दाखविण्याचे सामर्थ्य दाखविले नाही. तसेच कोणत्याही विभागाने संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकाºयांशी संपर्क व विचारविनिमय करण्याचे साधे सौजन्य दाखविले नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
पालकमंत्र्यानी दिलेले आदेश प्रशासनातील कोणत्याही अधिकाºयांनी अंमलात आणले नाही. पालकमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवून त्यांनी बैठकीत दिलेले निर्देश बासणात गुंडाळून ठेवण्याचेच काम संबंधित अधिकाºयांनी केले, असा स्पष्ट आरोप नवेगावबांध फाऊंडेशनने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या लेखी निवेदनातून केला आहे.

Web Title: Prohibition of Representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.