शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

उत्पादनात होणार ५० टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:37 IST

जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा अहवाल : जिल्ह्यात ४८ हजार हेक्टर नापेर क्षेत्र

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा कृषी विभागाने शासनाला एक अहवाल पाठविला आहे. त्यात पर्याप्त पाऊस न पडल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील ४७ हजार ९२९.०५ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. त्यामुळे यावर्षी धान उत्पादनात ४० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी शासनाने पाठविलेल्या अहवालानुसार, हलक्या भातपिकांच्या कापणीला सध्या सुरूवात झाली आहे. यावर्षी पर्जन्यमान समाधानकारक नसल्यामुळे उत्पादनात जवळपास ४० ते ५० टक्के घट येण्याची शक्यता आहे. ज्या शेतकºयांची शेती निसर्गावर अवलंबून आहे व थोड्याफार क्षेत्रामध्ये लागवड केली होती, त्या शेतकºयांच्या भातपिकांची वाढ खुंटली आहे. लोंबीमध्ये दाणे पूर्णपणे भरले नाहीत.सद्यस्थितीत मध्यम व भारी धानपिकांच्या लोंबी बाहेर पडणे व दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. कोरडवाहू भातपिकांच्या लोंबातील दाणे पावसाअभावी केवळ ३५ ते ४० टक्के भरलेले आहेत. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांचे पीक समाधानकारक आहे. सध्याची पीक परिस्थिती बघून भातपिकाची सरासरी उत्पादकता जवळपास एक हजार ते एक हजार १०० किलोग्रॅम होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. तसेच मध्यम व भारी भातपिकांवर खोडकिडीचा १ टक्के व करपा रोगाचा १ ते २ टक्के प्रादुर्भाव दिसून आलेला आल्याचे कृषी विभागाने अहवालात नमूद केले आहे.जिल्ह्यात एकूण एक लाख ९१ हजार ०३१ हेक्टर धानपीक उत्पादनाचा क्षेत्र आहे. यापैकी एक लाख ४३ हजार १०२ हेक्टर क्षेत्रात धानाचे पीक लावण्यात आले आहे. तर ४७ हजार ९२९ हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. सद्यस्थितीत हलके धानपीक कापणीला शेतकºयांनी सुरूवात केली आहे. मध्यम व भारी धानापिकावर खोडकिडा व करपा रोगाचा काही प्रमाणात प्रभाव दिसत आहे.९ हजार ०५७ हेक्टरमध्ये आवत्याजिल्ह्यात एकूण एक लाख ३४ हजार ०४५.२० हेक्टर क्षेत्रात धानपीक लावण्यात आले आहे. तर नऊ हजार ०५७ हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. गोंदिया तालुक्यात एक हजार ३५४ हेक्टर, गोरेगावात ५०४, तिरोडा येथे ११६, सडक अर्जुनी ३३६, अर्जुनी मोरगाव ५१५, आमगाव १६८, सालेकसा ९७२, देवरी पाच हजार ०९२ हेक्टरमध्ये आवत्या लावण्यात आल्या आहेत. एकूण नऊ हजार ०५७ हेक्टरमधील आवत्या मिळून जिल्ह्यात एक लाख ४३ हजार १०२.२० हेक्टरमध्ये धानपीक लावण्यात आले आहे.तीळ व तुरीच्या पिकांची स्थितीकृषी विभागाच्या माहितीनुसार तीळ पिकाचे बोंडे पक्वहोण्याच्या अवस्थेत असून येत्या पंधरवाड्यात काढणीला सुरूवात होण्याची शक्यता आहे. तर जिल्ह्यात तुर पिकाची लागवड बांधावर केली जात असून तुर पीक वाढीच्या अवस्थेत आहे.तालुकानिहाय भातपिकाचे नापेर क्षेत्रकाही दिवसांपासून अधूनमधून पाऊस येत आहे. काही शेतकºयांनी हलक्या धानाच्या कापणीला सुरूवात केली आहे. काही ठिकाणी धान कापून बांधात ठेवण्यातही आले आहे. मात्र परतीच्या पावसाने कापलेले धानपीक ओले होवून अंकुरितही झाले आहे. बांधात पाणी साचल्यामुळे धान खराब झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. शासन-प्रशासनाने सर्व्हेक्षण करून शेतकºयांना मदत मिळवून देणे गरजेचे आहे.