खासगी हॉस्पिटलमध्ये ५० टक्के बेड कोरोना रूग्णांसाठी राखीव ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST2020-08-26T05:00:00+5:302020-08-26T05:00:23+5:30
नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड राखीव केले. तसेच हॉस्पिटलला पत्र देऊन रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. याच पार्श्वभुमीवर गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेवून शहरातील ५ खासगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५० बेड राखीव ठेवण्याचे निर्देश द्यावे.

खासगी हॉस्पिटलमध्ये ५० टक्के बेड कोरोना रूग्णांसाठी राखीव ठेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. शासकीय रूग्णालयातील व्यवस्था सुद्धा अपुरी पडत आहे. तेथील सोयी सुविधांच्या अभावामुळे रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागपूरच्या धर्तीवर गोंदिया येथील किमान ५ खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी ५० बेड राखीव ठेवण्यात यावे अशी मागणी भाजयुमोचे माजी माजी जिल्हाध्यक्ष अभय सावंत यांनी केली आहे.
नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी बेड राखीव केले. तसेच हॉस्पिटलला पत्र देऊन रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. याच पार्श्वभुमीवर गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेवून शहरातील ५ खासगी रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५० बेड राखीव ठेवण्याचे निर्देश द्यावे. यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यास मदत होईल. येथील शासकीय रुग्णालयातील आणि कोविड केअर सेंटरमधील अनागोंदी कारभार दररोज पुढे येत आहे. रुग्णालयातील अवस्थेमुळे तिथे जाण्याची कुणीही हिम्मत करणार नाही. एखाद्या लोकप्रतिनिधीला कोरोनाची लागण झाली तर ते सुद्धा शासकीय रुग्णालयात दाखल होणार नाही अशी बिकट अवस्था या रुग्णालयांची झाली आहे. बरेच कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण केले जात आहे. शासकीय रुग्णालयात एखाद्या ह्दय रुग्णाला ज्याची एन्जीयोप्लास्टी झालेली आहे किंवा मधूमेह आणि उच्च रक्तदाब आहे. तसेच त्याला इतर आजार पण आहेत त्यांच्यासाठी किती स्पेशलिस्ट डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यांची रक्त चाचणी तिथे केली जाते का, त्यांच्या किडनी व मधुमेह, रक्तवाहिन्या संबंधित त्यांच्या टेस्ट केल्या जातात का? जात असतील तर तिथे कोणत्या-कोणत्या प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत का याबाबत शंका आहे.
त्यामुळे रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूरच्या पार्श्वभूमिवर येथील किमान ५ खासगी हॉस्पीटलमध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ५० बेड आरक्षित ठेवण्यात यावे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी सुध्दा पुढाकार घेण्याची गरज असल्याची सावंत यांची मागणी आहे.