पावसाळ्यात उद्भवलेल्या जलजन्य रोगांवर प्रतिबंधक उपाययोजना
By Admin | Updated: June 26, 2014 23:23 IST2014-06-26T23:23:37+5:302014-06-26T23:23:37+5:30
पावसाळा सुरू होत असताना जलजन्य अनेक साथरोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जलजन्य साथरोग नियंत्रण व शुध्द पाणी पुरवठा प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत अनेक

पावसाळ्यात उद्भवलेल्या जलजन्य रोगांवर प्रतिबंधक उपाययोजना
लोहारा : पावसाळा सुरू होत असताना जलजन्य अनेक साथरोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जलजन्य साथरोग नियंत्रण व शुध्द पाणी पुरवठा प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत अनेक उपाय सूचविण्यात आले आहेत.
कॉलरा, अतिसार, गॅस्ट्रो, काविळ, विषमज्वर असे अनेक प्रकारचे रोग पिण्याच्या दूषित पाण्यामुळे होत असतात. त्यामुळे पावसाळ्यात पिण्याचे पाणी योग्यप्रकारे निर्जंतुकीकरण करून वापरावे. लोकांना साथरोगाबाबद सतर्कता बाळगण्याविषयी जनजागृती करावी. ग्रामपंचायतीमध्ये ब्लिचिंग पावडर कमीतकमी तीन महिने पुरेल एवढा नियमित उपलब्ध राहील, याप्रमाणे खरेदी करून ठेवावे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतात योग्य प्रमाणात ब्लीचिंग पावडर घालून जनतेला शुध्द पाण्याचा नियमित पुरवठा करावा. ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची सभा नियमित आयोजित करून या विषयावर सविस्तर चर्चा करून गावात जनजागृती करावी. नळ योजनेंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईप लाईनची तपासणी करून गळती होणार नाही, याची काळजी घ्यावी. खडे असल्यास वेळीच बुजविण्यात यावे. गावातील गटारे व नाल्यातील सांडपाणी वाहण्याची ठिकाणे स्वच्छ करून वाहते करावे. विहिरींच्या व हातपंपाच्या सभोवताल पाणी साचून राहणार नाही, याची जबाबदारी घ्यावी. विहिरीचे ओटे, हातपंपाचे ओटे फुटलेले असल्यास त्याची दुरूस्ती त्वरीत करावी. परिसर स्वच्छ ठेवणे, केरकचरा व पालापाचोळ्याची योग्य विल्हेवाट करावी. याबाबद जनतेला जागृतीचे प्रबोधन द्यावे. डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी दर आठवड्यात दर शनिवारी कोरडा दिवस पाळावा. पाणी पुरवठा करताना ब्लिचिंग पॉवडरमध्ये ३३ टके व त्यापेक्षा जास्त क्लोरिन असावे, याची दक्षता घ्यावी. निकृष्ट दर्जाचा ब्लिचिंग पॉवडरचा वापर करू नये, या पद्धतींचा उपयोग करावा, असे आव्हान देवरीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. (वार्ताहर)