जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 05:00 IST2020-03-16T05:00:00+5:302020-03-16T05:00:04+5:30

अवघ्या जगावरच सध्या करोनाचे संकट ओढावले आहे. मोठ्या झपाट्याने करोना आपले पाय पसरत असून अजघडीला लाखोंच्या संख्येत रूग्णांची संख्या आहे. तर देशातही करोनाने आपले पाय पसरण्यास सुरूवात केली असून राज्यात २६ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. करोनाचा हा धोका बघता राज्यशासनाने प्रतिबंधक उपायही कडक केले आहेत.

Prevention of coagulation in the district | जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू

जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश : शाळा, अंगणवाडी, थिएटर व कार्यक्रमांवर बंदी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : झपाट्याने पाय पसरत असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातही शाळा-महाविद्यालय, अंगणवाड्या, थिएटर, तरणतलाव, व्यायामशाळा, नाट्यगृहे, म्युझियम तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांवर बंदी लावण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी रविवारी (दि.१५) आदेश काढले आहेत.
अवघ्या जगावरच सध्या करोनाचे संकट ओढावले आहे. मोठ्या झपाट्याने करोना आपले पाय पसरत असून अजघडीला लाखोंच्या संख्येत रूग्णांची संख्या आहे. तर देशातही करोनाने आपले पाय पसरण्यास सुरूवात केली असून राज्यात २६ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. करोनाचा हा धोका बघता राज्यशासनाने प्रतिबंधक उपायही कडक केले आहेत. यासाठी राज्यात शुक्रवारपासून (दि.१३) साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. यांतर्गत राज्यात शहरांतील शाळा-महाविद्यालय, मॉल्स, कोचिंग क्लास, नाट्यगृह, थिएटर आदिंवर बंदी लावण्यात आली आहे.
त्यानुसार, कनोरा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातही नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक व क्रीडाविषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होत पर्यंत परवानगी देण्यात येऊ नये तसेच यापूर्वी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्याच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील चित्रपटगृह, तरणतलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह व म्युझियम सुद्धा ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी रविवारी (दि.१५) काढले. या आदेशाचे पालन न करणाºया कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता १८६० (४५) च्या कलम १८८ शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येणार व पुढील कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे.

शाळा-महाविद्यालय व अंगणवाडींना सुटी
लोकांची गर्दी होणार याबाबतची दक्षता घेत विविध कार्यक्रम व गर्दीच्या ठिकाणांवर बंदी लावण्यात आली आहे. अशात शाळा-महाविद्यालय तसेच अंगणवाडीत विद्यार्थ्यांची गर्दी होते. ही बाब लक्षात घेत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजही शाळा तसेच महाविद्यालये व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनांवरील शैक्षणिक संस्था तसेच अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, १० व १२ वीच्या परीक्षा तसेच विश्व विद्यालयाच्या परीक्षा विहीत वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.

Web Title: Prevention of coagulation in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.