न.प.निवडणुकीची मतदार यादी तयार

By Admin | Updated: November 12, 2016 00:29 IST2016-11-12T00:29:38+5:302016-11-12T00:29:38+5:30

गोंदिया नगर परिषदेच्या येत्या ८ जानेवारीला होऊ घातलेल्या सार्वित्रक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय

Prepare voter list of election | न.प.निवडणुकीची मतदार यादी तयार

न.प.निवडणुकीची मतदार यादी तयार


गोंदिया : गोंदिया नगर परिषदेच्या येत्या ८ जानेवारीला होऊ घातलेल्या सार्वित्रक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मतदार यादीत ज्या प्रभागात मतदाराचे नाव समाविष्ट आहे त्यामध्ये आगामी नगर परिषद निवडणूकीपर्यंत कुठलाही बदल करण्यात येणार नाही.
ज्या व्यक्तींनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याकरीता किंवा प्रभागातील पत्ता बदलण्याकरीता अर्ज केला होता पण त्याप्रमाणे मतदार यादी अद्यावत झालेली नाही, त्या व्यक्तीचा या नगर परिषद निवडणुकीमध्ये अनुक्र मे मतदान करण्याचा किंवा प्रभाग बदलण्याचा कुठलाही आक्षेप आता विचारात घेण्यात येणार नाही. त्याचा आक्षेप १ जानेवारी २०१७ रोजीच्या अर्हता दिनांकावर प्रसिध्द होणाऱ्या मतदार यादीमध्ये विचारात घेण्यात येणार आहे. मात्र त्या मतदारांना या गोंदिया नगर परिषद सार्वित्रक निवडणुकीत त्यांच्या अर्जानुसार मतदानाचा हक्क बजावता येणार नाही, असे गोंदियाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी कळविले आहे.

Web Title: Prepare voter list of election