विरोधाला न जुमानता प्रेमवीरांचे मनोमिलन

By Admin | Updated: February 15, 2015 01:24 IST2015-02-15T01:24:47+5:302015-02-15T01:24:47+5:30

बजरंग दल व शिवसेनेचा विरोध न जुमानता शनिवारी अनेक प्रेमविरांनी थोडे दबावात असतानाही एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्याची संधी सोडली नाही.

Premvir's mindset despite opposition | विरोधाला न जुमानता प्रेमवीरांचे मनोमिलन

विरोधाला न जुमानता प्रेमवीरांचे मनोमिलन

गोंदिया : बजरंग दल व शिवसेनेचा विरोध न जुमानता शनिवारी अनेक प्रेमविरांनी थोडे दबावात असतानाही एकमेकांना भेटून शुभेच्छा देण्याची संधी सोडली नाही. एकमेकांसाठी आणलेले गुलाबपुष्प आणि प्रेमाची भेट देऊन युवा वर्गाने ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला. काहींनी लपून-छपून आपल्या जोडीदाराची भेट घेतली, तर काहींनी विरोधकांच्या भीतीने प्रत्यक्ष भेट न घेता आॅनलाईन गप्पा मारल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे १४ फेब्रुवारीला विरोधक आपल्याला ‘डिस्टर्ब’ करतील म्हणून काहींनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला म्हणजे १३ फेब्रुवारीलाच माहौल केल्याचे दिसून आले.
प्रेमवीरांचा हक्काचा दिन म्हणून आजच्या काळात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. त्यामुळेच प्रेमवीर १४ फेब्रुवारीची आतुरतेने वाट बघत असतात. आपल्या जोडीदाराला काही वेगळी भेट देण्यासाठी त्यांची वर्षभरापासून तयारी सुरू असते.
मात्र व्हॅलेंटाईन डे हा परदेशी संस्कृतीचा भाग असल्याचे सांगत बजरंग दल व शिवसेना हा दिवस साजरा करण्यास विरोध करतात. हा दिन साजरा केला जाऊ नये यासाठी रॅली काढून व प्रेमविर भेटू शकतील अशा ठिकाणांवर नजर ठेऊन असतात. त्यानुसार यंदाही बजरंग दलाने रॅली काढली व प्रेमविर एकमेकांची भेट घेणार अशा ठिकाणांवर जाऊन पाहणी केली.
वर्षातून एकदा येणाऱ्या व वर्षभर ज्या दिवसाची वाट बघितली जाते तो दिवस असा हातून जाऊ नये यामुळे दबावात का होईना, उत्साहात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आल्याचे शहरात दिसून आले. व्हॅलेंटाईन डे असल्याने शहरातील सुभाष बागेत काही जोडपी एकांतात बसून गप्पा मारताना दिसून आली. एरवी जेवढी संख्या असते तेवढी नसली तरी या प्रेमविरांनी कुणाचाही विरोध सहन केला जाणार नसल्याचे यातून दाखवून दिले. (शहर प्रतिनिधी)
बजरंग दलाने काढली रॅली
व्हॅलेंटाईन डे ही आपली संस्कृती नसल्याने हा दिवस साजरा करण्यासाठी आमचा विरोध असल्याचे बजरंग दलचे नगर संयोजक वसंत ठाकूर यांनी सांगितले. आपला विरोध दर्शवित शहरात बजरंग दलने सकाळी मोटारसायकल रॅली काढली. शिवाय शहरातील शाळा व महाविद्यालय तसेच साईबाबा मंदिर, सुभाष बगिचा व अन्य ठिकाणांवर जाऊन व्हॅलेंटाईन डे साजरा न करण्याचे आवाहन करण्यात आले. सायंकाळीही कार्यकर्ते काही ठिकाणांवर नजर ठेऊन होते. कुणी हाती लागल्यास त्यांना त्यांच्या पालकांच्या सुपूर्द केले जाणार असल्याचे ठाकूर यांनी सांगीतले.
व्हॉटस् अ‍ॅपवरूनही फिरले शुभेच्छा संदेश
बजरंग दलासारख्या संघटनेचा विरोध बघता काही स्मार्ट युवकांनी आपल्या जोडीदाराला मोबाईल कॉल व व्हॅट्सअ‍ॅपवरूनच शुभेच्छा दिल्या. कित्येकांनी तर १४ तारखेला होणारा विरोध लक्षात घेत १३ तारखेलाच जोडीदाराची भेट घेऊन ‘विश’ केले. तर काहींनी यासाठी १५ तारखेला कार्यक्रम आखून ठेवला आहे. आजच्या घडीला व्हॅट्सअ‍ॅप युवावर्गासाठी बोलण्याचे व फोटो शेअरींगचे प्रभावी माध्यम ठरत आहे. त्यामुळे उगाच रिस्क न घेता व्हॅट्सअ‍ॅपवरूनच जोडीदाराशी संवाद साधण्यावरही युवावर्गाचा भर दिसून आला.

Web Title: Premvir's mindset despite opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.