शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
2
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
3
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
4
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
5
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
6
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
7
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
8
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
9
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
10
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
11
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
12
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
13
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
14
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
15
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
16
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
17
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
18
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
19
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!

निकृष्ट दर्जाचे काळे खांब, त्यावर अल्पशा सिमेंटचा थर; नवेगावबांध-सानगडी विद्युत लाइन प्रकल्पात मोठा घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 19:31 IST

Gondia : विद्युत विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार हातात हात घालून केंद्र सरकारच्या निधीचा गैरवापर करत असल्याचे गंभीर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : झिरो ब्रेकडाऊन पॉलिसी अंतर्गत केंद्र सरकारच्या योजनेतून सुरू असलेल्या नवेगावबांध-सानगडी विद्युत लाइनच्या कामात प्रचंड अनियमितता होत असल्याची चर्चा आहे. केंद्र सरकारने होल्टेज ड्राफ्ट कव्हर करण्यासाठी आणि अखंडित वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने हे काम मंजूर केले आहे. मात्र, प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याची ओरड सुरू आहे.

सध्या नवेगावबांध सर्कलमधील भिवखिडकी, बाराभाटी, परसोडी, झाशीनगर या गावांमध्ये विद्युत लाइनचे काम सुरू आहे. नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत गंभीर आक्षेप घेतले आहेत. गोंदिया जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष किशोर तरोने यांनी आक्षेप घेतला आहे. विद्युत विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार हातात हात घालून केंद्र सरकारच्या निधीचा गैरवापर करत आहेत. नियमानुसार जंगरोधक लोखंडी खांब असायला हवेत; मात्र त्याऐवजी निकृष्ट दर्जाचे काळे लोखंडी खांब लावले जात आहेत. त्यांना योग्य रेड ऑक्साइड, सिल्व्हर रंग न लावता अल्पशा सिमेंट काँक्रीटमध्ये उभे केले जात आहे. हा सरळसरळ जनतेच्या पैशाचा अपव्यय असून, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

चौकशी करून कारवाई करा

केंद्र सरकारचा निधी आणि मार्गदर्शक तत्त्वे असतानाही काम निकृष्ट दर्जाचे का चालले आहे? अधिकारी, कंत्राटदार आणि कंपनी यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शासनाने या कामाची तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

नियमानुसारच काम सुरू

कामाचे प्रत्यक्ष प्रभारी अधिकारी असलेले पॉलीकॅब कंपनी गोंदिया सर्कलचे प्रभारी लोकेश दादोरिया यांनी सांगितले की रस्त्याच्या बाजूला शेतजमीन असल्याने शेतकरी पूर्ण शिफ्ट देत नाहीत. त्यामुळे खांब आम्ही रोडच्या मध्यभागातून ४, ५ किंवा ६ मीटर अंतर ठेवून बसवतो. मटेरियल एम. एस असून, रेड ऑक्साइड लावले जात आहे. केंद्र सरकारच्या गाइडलाइननुसार झिरो ब्रेकडाऊन पॉलिसी अंतर्गत होल्टेज ड्राफ्ट कव्हर करण्यासाठी हे काम सुरू आहे.

"प्रकल्पात जे नमूद असेल त्याप्रमाणेच काम होतं. लोखंडी खांबाचा समावेश असेल तर तेच बसविले जातात. १० ते ११ मीटरचे पोल ४ ते ५ फूट खोलीपर्यंत गाडून रेड ऑक्साइड व सिल्व्हर रंग लावून काँक्रीटने मजबुती दिली जाते. सर्व काम आमच्या देखरेखीखालीच होतं. जंगरोधक लोखंडी खांब असणे आवश्यक नाही, प्रकल्पात नमूद असेल तरच तेच खांब वापरण्यात येतील."- डी. एस. पाटील, उपकार्यकारी अभियंता महावितरण अर्जुनी मोरगाव

English
हिंदी सारांश
Web Title : Substandard poles, thin cement: Corruption in Navegaonbandh-Sanagadi power line project.

Web Summary : Navegaonbandh-Sanagadi power line work faces corruption allegations. Substandard poles are being used with minimal cement. Locals demand investigation into misuse of central funds.
टॅग्स :fraudधोकेबाजीGovernmentसरकार