Police were kept | पोलिसांना बांधल्या राख्या
पोलिसांना बांधल्या राख्या

गोंदिया : स्व.वैजयंती खरे व स्व.सुमन सराफ प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्रिदन व रक्षाबंधनाचे निमित्त साधून एरंडी या नक्षलग्रस्त गावात गोंदिया पोलीस व ग्रामस्थांच्या सहकार्याने एक अतुट नाते निर्माण करण्याचा योग रक्षाबंधनाने जुळुन आला. अरविंद सराफ, सुहास खरे, नितीन आंबटकर, नागपुरे, ठाणेदार पर्वते, ऐओपी इंचार्ज विनोद बुरले यांच्या हस्ते गावातील महिलांना साड्या व स्टीलची भांडी तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. पश्चात, स्मीता सराफ, अर्चना कोटेवार, प्राची गांगुलवार, वीणा बोरीकर यांनी उपस्थित पुरूष, मुले व पोलीसबांधवांना सनराईज शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी कोरटकर व सहकारी शिक्षिकांनी शालेय मुलांकडून तयार करवून घेतलेल्या राख्या औक्षवण करून बांधल्या व टॉवेल तसेच नॅपकीन भेट दिले. शैलेश मानकर, सुरेंद्र खरे, विनोद डोरलीकर, राजु बंसोडे, स्मित गुप्ता यांनी सहकार्य केले.

Web Title: Police were kept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.