पोलीस वाहनाची कंटेनरला धडक : तीन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 22:00 IST2018-05-10T22:00:11+5:302018-05-10T22:00:11+5:30
फुलचूर रोडवरील जलाराम लॉन्सजवळ पोलिसांच्या वाहनाने एका कंटेनरला धडक दिली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

पोलीस वाहनाची कंटेनरला धडक : तीन जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : फुलचूर रोडवरील जलाराम लॉन्सजवळ पोलिसांच्या वाहनाने एका कंटेनरला धडक दिली. यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले.
यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना गुरूवारी (दि.१०) दुपारी १ वाजताच्या सुमारास गोंदिया-गोरेगाव मार्गावर घडली.
पोलीस निरीक्षक (वायरलेस) चंद्रकांत कुटे, वाहन चालक योगेश बहेकार व पोलीस शिपाई सूरज गुप्ता अशी अपघातात जखमीे झालेल्यांची नाव आहेत. पोलीस मुख्यालय कारंजाकडून वाहनाने (एमएच ३५/डी-४५५) पोलीस कर्मचारी गोंदियाकडे येत होते. फुलचूर रोडवर जलाराम लॉन्सजवळ त्यांच्या वाहनासमोर एक गाय आली. या गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे संतुलन बिघडले व पोलीस वाहन कंटेनरवर (एमआर ३८/डब्ल्यू-०४४४) धडकले. जखमी पोलिसांना तात्काळ गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शहर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडला. मागील काही दिवसांपासून या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.