पोलिसांनी काढली मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:45 AM2018-10-17T00:45:41+5:302018-10-17T00:46:23+5:30

शहरातील नागरिकांना हेल्मेट संदर्भात जागृत करण्यासाठी मंगळवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता जिल्हा वाहतूक पोलिसांकडून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत १५० पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

Police raid motorcycle rally | पोलिसांनी काढली मोटारसायकल रॅली

पोलिसांनी काढली मोटारसायकल रॅली

Next
ठळक मुद्देहेल्मेट जनजागृती: पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील नागरिकांना हेल्मेट संदर्भात जागृत करण्यासाठी मंगळवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता जिल्हा वाहतूक पोलिसांकडून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत १५० पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी १५० जण रस्ता अपघातात मृत्यू पावतात.त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तीचां अवकाळी मृत्यू होतो.वाहन चालक प्राणास मुकू नये यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे १५ आॅक्टोबरपासून सक्तीचे करण्यात आले होते.
परंतु गोंदियाच्या बाजारात हेल्मेटचा तुटवडा असल्याने हेल्मेट सक्ती तीन दिवस उशीरा सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी गोंदिया शहरातील वाहन चालकांना जागृत करण्यासाठी मनोहर चौक गोंदिया येथून रॅली काढण्यात आली. रॅली मुख्य बाजारपेठ, रामनगर सिव्हील लाईन होत वाहतूक शाखेत पोहचली.
या रॅलीचे नेतृत्व पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी केले. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक महिपालसिंह चांदा, पोलीस निरीक्षक हेमने, मनोहर दाभाडे, घोटेकर, जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सिंग, संदीप चव्हाण, गणेश धुमाळ, बघेल, मेश्राम, ३६ पोलीस कर्मचारी, पोलीस मुख्यालयाचे ४० कर्मचारी, गोंदिया शहर ठाण्यातील ८ कर्मचारी, रामनगरचे ५ कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बलाचे ५ कर्मचारी व इतर २५ लोक असे १५० लोक रॅलीत सहभागी झाले होते.

Web Title: Police raid motorcycle rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस