तिरोडा येथील चार अवैध दारूभट्ट्यांवर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:33 IST2021-03-01T04:33:36+5:302021-03-01T04:33:36+5:30

तिरोडा : मिळालेल्या गुप्त माहितीवरून तिरोडा पोलिसांनी रविवारी (दि. २८) संत रविदास वॉर्ड येथील चार अवैध दारूभट्ट्यांवर ...

Police raid four illegal distilleries in Tiroda | तिरोडा येथील चार अवैध दारूभट्ट्यांवर पोलिसांची धाड

तिरोडा येथील चार अवैध दारूभट्ट्यांवर पोलिसांची धाड

तिरोडा : मिळालेल्या गुप्त माहितीवरून तिरोडा पोलिसांनी रविवारी (दि. २८) संत रविदास वॉर्ड येथील चार अवैध दारूभट्ट्यांवर धाड टाकून २ लाख २१ हजार रुपयांचा दारु साठा जप्त केला. अवैध दारु विक्रेत्यांनी खंडार तयार करून साठवून ठेवलेला मोहफुलांचा साठा जप्त केला.

पोलिसांनी या कारवाईत अकील रहीम खा पठाण यांच्या घराच्या परिसरात जमिनीत गाडलेले ३१ प्लास्टिक चुंगडीत ६२० किलो सडवा मोहफुल आणि हातभट्टी साहित्य असा एकूण ४९,६०० रुपयांचा माल जप्त केला. साबीर रहीम खा पठाण याच्या घराच्या परिसरात बंद खोलीत ५१ प्लास्टिक चुंगडीत ५१ किलो सडवा मोहफुल, हातभट्टी साहित्य एकूण ८,१०० रुपयांचा मुद्देमाल माल जप्त केला. तसेच पूर्णा प्रल्हाद तांडेकर यांच्या घराच्या आवारात १६ प्लास्टिक चुंगडीत ३२९ किलो सडवा मोहफुल, हातभट्टी साहित्य असा एकूण २५,६०० रुपयांचा माला मिळाला. सुरज प्रकाश बरयीकर (रा. संत रविदास वॉर्ड, तिरोडा) यांच्या घराच्या झडतीत ४१ प्लास्टिक चुंगडीत ८२० किलो सडवा मोहफुल ६५,६०० रुपये असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चारही आराेपींवर तिरोडा पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पाेलीस निरीक्षक योगेश पारधी, पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे, नापोशी बर्वे यांनी केली.

Web Title: Police raid four illegal distilleries in Tiroda