पोलिसांना चकमा देऊन तीन ट्रक पळविले

By Admin | Updated: November 2, 2016 00:22 IST2016-11-02T00:22:34+5:302016-11-02T00:22:34+5:30

क्षमतेपेक्षा २५-३५ टन अधीक भार वाहून नेताना उप विभागीय पोलीस अधीकारी मंदार जवळे यांनी जप्त केलेले तीन ट्रक

Police drove three trucks by dodging | पोलिसांना चकमा देऊन तीन ट्रक पळविले

पोलिसांना चकमा देऊन तीन ट्रक पळविले

पाच लाखांचा दंड चुकवला : उप विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केली होती कारवाई
देवरी : क्षमतेपेक्षा २५-३५ टन अधीक भार वाहून नेताना उप विभागीय पोलीस अधीकारी मंदार जवळे यांनी जप्त केलेले तीन ट्रक पोलिसांना चकमा देऊन २९ आॅक्टोबर रोजी पळविण्यात आले. ठोठावण्यात आलेला पाच लाख रूपयांचा दंड भरता हे ट्रक पळविण्यात आल्याने देवरी पोलिसांनी ट्रक मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरटीओ नाक्याला वाचवून सालेकसा-देवरी मार्गे राष्ट्रीय महामार्गावर निघणाऱ्या ओव्हरलोड चार वाहनांवर उप विभागीय पोलीस अधिकारी जवळे यांनी १७ आॅक्टोबर रोजी कारवाई केली होती. आरटीओंना बोलावून या गाड्यांचे वजन केले असता त्यात प्रत्येकी क्षमतेपेक्षा २५ ते ३५ टन अतिरीक्त भार मिळून आला. चार ट्रक पैकी ट्रक क्रमांक सीजी ०७/एव्ही २४८ च्या मालकाने दंड भरून आपला ट्रक सोडवून नेला.
परंतु, कमलजीतसिंह महेंद्रसिंग (रा.भिलाई) यांच्या ट्रक क्रमांक सीजी ०७/सीबी ०९११, सीजी ०७/एक्स ९४११ व एमएच २०/एनई ३६११ यांना पाच लाख रूपयांचा दंड आकारण्यात आला होता. यावर मात्र कमलजीतसिंह यांनी दंड न भरता न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयात खटला सुरू असताना हे ट्रक पोलिसांना चकमा देऊन २९ आॅक्टोबर रोजी रात्री देवरी पोलीस ठाण्यासमोरून पळविण्यात आले. प्रकरणी देवरी पोलिसांनी ट्रक मालकाविरूद्ध कलम १८८, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उप निरीक्षक रामदास शेळके करीत आहेत. (प्रतिनिधी)

प्रशासनावर ओव्हरलोड वाहन हावी
पोलीस व परिवहन विभागाच्या नजरेसमोर सिरपूर तपासणी नाक्याच्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या ढाब्यांवर दररोज शेकडो अधीक भार क्षमतेच्या वाहनांमधून अतिरीक्त भार दुसऱ्या वाहनांत टाकण्याचे अवैध कार्य कित्येक दिवसांपासून सुरू आहे. मात्र उभ्या वाहनांवर कारवाई करणे शक्य नसल्याचे आरटीओ अधिकारी सांगत आहेत. तर दुसरीकडे पोलीस विभाग या अवैध कामावर आळा का घालत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच आरटीओंची नजर चुकवून डोंगरगड, दरेकसा, सालेकसा, देवरी ते राष्ट्रीय महामार्गावर अधीक भारक्षमतेचे शेकडो वाहन दररोज जात असल्याने लाखोंचा महसूल बुडत आहे. राज्यात ओव्हरलोड वाहनांवर बंदी असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहन धावत आहेत. याला कोणाचे अभय मिळत आहे. याकडे आता तरी प्रशासन लक्ष देणार की नाही, की हे सगळ असच चालत राहणार हे सर्व प्रश्न नियमानुसार कार्य करित असलेल्या ट्रांसपोर्टर कडून उपस्थित केले जात आहे.

Web Title: Police drove three trucks by dodging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.