गोंदिया जिल्ह्यात रेल्वेखाली आल्याने पोलिसाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 11:44 IST2018-04-10T11:43:59+5:302018-04-10T11:44:09+5:30
सालेकसा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार सुरेश भगवंतराव पाटील (४९) रा. फुलचूर नाका यांचा आज दि. १० रोजी सकाळी ८.१५ वाजता रेल्वेखाली आल्याने अपघाती मृत्यू झाला.

गोंदिया जिल्ह्यात रेल्वेखाली आल्याने पोलिसाचा मृत्यू
ठळक मुद्देपाय घसरल्याने झाला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: सालेकसा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार सुरेश भगवंतराव पाटील (४९) रा. फुलचूर नाका यांचा आज दि. १० रोजी सकाळी ८.१५ वाजता रेल्वेखाली आल्याने अपघाती मृत्यू झाला. ते सालेकसा पोलीस ठाण्यात नोकरी करण्यासाठी रेल्वे येत होते. गाडीतून उतरताना पाय घसरल्याने ते गाडीखाली आले व त्यांचे डोके फलाटावर आपटले. यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.