अर्जुनी बोंडरानी नाक्यावर पोलीस तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 06:00 IST2019-09-30T06:00:00+5:302019-09-30T06:00:06+5:30
तिरोडा तालुक्यातील मध्यप्रदेशात जाणाऱ्या अर्जुनी बोंडरानी नाक्यावर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या आणि महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाºया वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

अर्जुनी बोंडरानी नाक्यावर पोलीस तैनात
परसवाडा : विधानसभा निवडणुकी दरम्यान अवैध दारु आणि रोख रक्कम घेऊन जाण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात.या प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासनाने सुध्दा विविध उपाययोजना केल्या आहेत. याच अंतर्गत तिरोडा तालुक्यातील मध्यप्रदेशात जाणाऱ्या अर्जुनी बोंडरानी नाक्यावर पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या आणि महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाºया वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका शांततेत पार पडव्यात. पर राज्यातून निवडणुकीसाठी अवैध दारु व पैसा, अंमली पदार्थ, स्फोटक द्रव्ये आणि असामाजिक तत्वावर नजर ठेवण्यासाठी निवडणूक विभाग आणि पोलीस विभागातर्फे जिल्ह्याच्या सीमावर्तीत भागात तपासणी नाके सुरू केले आहे. दवनीवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांनी आणि महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक यांच्या संयुक्तपणे बोंडरानी नाक्यावर मध्यप्रदेशकडे जाणारे दुचाकी, चारचाकी, ट्रक, जीप, कंटेनर, बसची तपासणी करीत आहे. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस कर्मचारी रात्रंदिवस गस्त घालून आणि व्हिडिओ शुटींग करुन वाहनाची तपासणी करीत आहे.