शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

पोलीस वसाहतीच्या स्वच्छतेचा युवकांनी उचलला विडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:33 AM

‘मरावे परी किर्तीरुप उरावे’ अशी मराठी म्हण आहे. ज्या समाजात जगलो, मोठे झालो त्या समाजाचे ऋण फेडायला पाहिजे. या भावनेतून गोरेगाव येथील जय महाकाल ग्रुपच्या ४० युवकांनी पोलीस वसाहतीत स्वच्छता अभियान राबवून, झोपी गेलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देजय महाकाल ग्रुपचा पुढाकार : ४० युवकांचे श्रमदान

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : ‘मरावे परी किर्तीरुप उरावे’ अशी मराठी म्हण आहे. ज्या समाजात जगलो, मोठे झालो त्या समाजाचे ऋण फेडायला पाहिजे. या भावनेतून गोरेगाव येथील जय महाकाल ग्रुपच्या ४० युवकांनी पोलीस वसाहतीत स्वच्छता अभियान राबवून, झोपी गेलेल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. स्वत: श्रमदान करुन समाजाप्रती असलेले ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (दि.१५) सकाळी ७ वाजता युवकांनी स्वच्छता अभियान राबवून पोलीस वसाहतीचा कायापालट करण्याचा विडा उचलला.‘लोकमत’ने ‘पोलीस वसाहतीला अखेरची घरघर’ या मथळ्याखाली १३ डिसेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. घरासमोर कचराकुंड्या नाही, सर्वदूर कचरा, खिडक्यांचे काच फुटलेले, शुद्ध पाण्याची सोय नाही हे जळजळीत वास्तव समोर आणले. याची स्थानिक जयमहाकाल ग्रुपने याची दखल घेतली. ४० युवकांना हाताशी घेत या ग्रुपने श्रमदानातून स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. प्रशासनाने स्वच्छतेविषयी जागृती केली असली तरी पोलीस वसाहतीतील अस्वच्छतेमुळे येथील कुटुंबियांना अनेक गैरसोयीला सामोरे जावे होते. समाजातील एक महत्वाचा घटक म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. २४ तास गस्त बंदोबस्त यात व्यस्त असणारे पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेणे ही समाजाची सुध्दा जबाबदारी आहे. मात्र संवेदना बोथट झालेल्या प्रशासनाला पोलिसांच्या समस्येविषयी काहीही घेणे देणे नाही. फक्त पोलिसांनी लोकांच्या समस्या सोडवाव्या, या अलिखित फतव्यामुळे प्रशासनही त्यांच्याकडे कानाडोळा करीत असेल तर यापेक्षा मोठे दुदैव काय. लोकमतने पोलीस वसाहतीच्या समस्यांविषयी बातमी प्रकाशित केल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांनी लोकमतने कौतुक केले. पण पोलीस वसाहतीतील समस्यांना सोडविण्यासाठी कुणीही पुढे येण्याचे धाडस केले नाही. मात्र जय महाकाल या व्हॉटस्प ग्रुपने, ग्रुपवर सर्व सदस्यांशी चर्चा करुन पोलीस वसाहतीच्या आवारात स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प केला. युवकांनी श्रमदान करुन परिसर स्वच्छ केला. श्रमदानाला माजी उपसरपंच राहुल कटरे, नरेश अगडे, पवन रहांगडाले, सोनू पटले, महेंद्र गौतम, संतोष पटले, मुन्ना बिसेन, गुड्डू कटरे, नंदलाल सोनवाने, अमोल लांजेवार, सुधीर कटरे, पंचभाई, रवि कुंभरे, रविंद्र रहांगडाले, सचिन ठाकरे, मंगेश शेंडे, सौरभ पारधी, रामेश्वर कापसे, सतिश बावणकर, गोपाल हत्तीमारे, आनंद चर्जे, राजेंद्र बगळते, विजय बिसेन, रामू येल्ले उपस्थित होते.पोलिसांनी मानले लोकमतचे आभारपोलीस वसाहतीतील विविध समस्या लोकमतने चव्हाट्यावर आणल्यावर व दोन दिवसातच येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याने येथील पोलीस कुटुंबियांनी लोकमतचे आभार मानले.लोकमतमध्ये पोलीस वसाहतीला अखेरची घरघर बातमी वाचली. त्यानंतर दोन दिवस वाट पाहली. स्थानिक प्रशासन काहीतरी उपाय योजना करेल असे वाटले मात्र त्यांनी कुठलेच पाऊल न उचलल्याने जय महाकाल ग्रुपच्या माध्यमातून वसाहत परिसरात श्रमदान करण्याचा संकल्प केला.- राहुल कटरे, अध्यक्ष जय महाकाल ग्रुप.प्रथम समस्येची बातमी प्रकाशित करायची व त्या बातमीचा पाठपुरावा करायचा हे लोकमत वृत्तपत्राचे काम प्रशंसनिय आहे. मी मनापाूसन लोकमतचे आभार मानतो.- एस.डी.दसूरकर, पोलीस निरीक्षक, गोरेगाव.

टॅग्स :Policeपोलिस