ठिकठिकाणी कारवाई करून पोलिसांनी पकडली दारू

By Admin | Updated: June 9, 2017 01:24 IST2017-06-09T01:24:03+5:302017-06-09T01:24:03+5:30

जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करून पोलिसांनी मोहफुलांची व देशी दारू जप्त केली.

The police caught the liquor by taking action at all | ठिकठिकाणी कारवाई करून पोलिसांनी पकडली दारू

ठिकठिकाणी कारवाई करून पोलिसांनी पकडली दारू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करून पोलिसांनी मोहफुलांची व देशी दारू जप्त केली.
अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चापटी येथील रामकृष्ण चकटू पुराम (६२) याच्याकडून १० नग देशी दारूचे पव्वे, तिरोडा तालुक्याच्या जमनानगर येथील किरण देवा मालाधरे (२७) हिच्याकडून २० लिटर हातभट्टीची दारू, अंजोरा येथील शंकर दुलीचंद उईके (३५) याच्याकडून साखरीटोला येथे ८ नग देशी दारूचे पव्वे, मरामजोब येथील वीणा नारायण शहारे (४५) हिच्याकडून ९ देशी दारूचे पव्वे, घिवारी येथील सरोजपुरी पुरजपुरी वैकुंठी (४०) याच्याकडून ४ नग देशीे दारूचे पव्वे, आमगावच्या बेदाडी येथील रविंद्र शिवचरण कनोजे याच्याकडून ४३२ नग देशी दारूचे पव्वे (किंमत २१ हजार ६०० रुपये) पकडण्यात आला.
लोधीटोला येथील सोनी महागू मेश्राम (६५) या महिलेकडून ११ नग देशी दारूचे पव्वे, मंदिटोला येथील रामू किशन पटले (४०) याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, खाडीपार येथील परसराम चंद्रशेखर गुंडमवार (३५) याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, सावंगी येथील श्रीराम नत्थू चाचेरे (४०) याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, शिवणटोला येथील अनिता नारायण मदनकर (४५) हिच्याकडून ३ नग देशी दारूचे पव्वे, परसोडी येथील विजया श्रीनिवास मेरगुरवार (३८) हिच्याकडून चार नग देशी दारूचे पव्वे, खाडीपार येथील परसराम चंद्रशेखर गुंडमवार ४ नग देशी दारूचे पव्वे, छिपीया येथील मुकेश कमलदास उके (३२) याच्याकडून १० लिटर हातभट्टीची दारू, मरारटोला-काटी येथील राजेश लालचंद कावरे (२४) याच्याकडून ७ लिटर हातभट्टीची दारू, रावणवाडी येथील कौशल गेंदलाल दमाहे (६२) याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, जगनटोला येथील कल्पना अनिल रामटेके (४४) हिच्याकडून चार नग देशी दारूचे पव्वे, पलानगाव येथील दिलीप मुकाजी जनबंधू (४२) याच्याकडून १० नग देशी दारूचे पव्वे, गड्डाटोली येथील मीना दिलीप डोंगरे (३०) हिच्याकडून ५ नग देशी दारूचे पव्वे, रामनगर येथील अभिनय राजेंद्र नशिने (२९) याच्याकडून २२ नग देशी दारूचे पव्वे, आंबाटोली येथील बाबू नवशाद गफार शेख (३५) याच्याकडून १२ नग देशी दारूचे पव्वे, बडटोला येथील सुरेश शालीकराम मरस्कोल्हे याच्याकडून ५ लिटर मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली.
सुकाटोला येथील ज्ञानीराम घुगन कटरे (६५) याच्याकडून ३० पव्वे, लोहारा येथील दिलीप भरतराम पंधरे (५०) याच्याकडून ४ नग देशी दारूचे पव्वे, गांगला येथील मुन्नालाल भरत कापसे याच्याकडून १५ लिटर हातभट्टीची दारू, सुकडी-डाक येथील फुलचंद जंगलू शेंडे (४५) याच्याकडून १२ लिटर हातभट्टीची दारू, गोंडीटोला येथील सुरेश उकेकडून ६० लिटर हातभट्टीची दारू, लोधीटोला येथील नरेंद्र शिवराम सव्वालाखे याच्याकडून १२ लिटर हातभट्टीची दारू, लेंडीटोला येथील अशोक अभिमन्यू उके (४०) याच्याकडून १५ लिटर हातभट्टीची दारू, गोंदिया शहराच्या झोपडी मोहल्यातील श्रावणदास माणिकपुरी (३९) कडून ८ लिटर, जोगलेकर वॉर्डातील किशोर मौजे (४१) याच्याकडून ९ लिटर, चुटीया येथील दुर्गाप्रसाद लांजेवार (३५) याच्याकडून ४ लिटर, मोहरामटोली येथील संतोष गोडबोले (४९) कडून ६ नग देशी दारूचे पव्वे, ईर्री येथील जितेंद्र भालाधरे (४०) ६ देशी दारूचे पव्वे, इटखेडा येथील रामकृष्ण घोरमोडे (५५) ३ लिटर हातभट्टीची दारू, ताडगावच्या राजीव नगरातील दशरथ शहारे (४५) याच्याकडून ५७ नग देशी दारूचे पव्वे जप्त करण्यात आले.

Web Title: The police caught the liquor by taking action at all