शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
5
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
6
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
7
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
8
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
9
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
10
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
11
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
12
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
13
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
14
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
17
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
18
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
19
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
20
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेत लूट

By admin | Updated: September 1, 2014 00:43 IST

पीक विमा योजनेत लूट; मानोरा येथील शेतकर्‍यांचा आरोप : पाच वर्षाच्या हिशोबाची मागणी.

मानोरा : शेतकर्‍यांच्या हिताकरिता आणि संरक्षणाकरिता राबविण्यात येणारी पीक विमा योजना शेतकर्‍यांच्या हिताची नसून लुबाडणारी व फसवणूक करणारी योजना असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. लालुच दाखवून आपली फसवेगिरी केली जात असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. मागील पाच वर्षात शेतकर्‍यांची विम्याच्या नावे दिलेल्या रकमेचा हिशेब पाहून विम्याची रक्कम किती देण्यात आली व कोणाला देण्यात आली, त्यांची नावे जाहीर करण्यात यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, शासन आणि विमा कंपनीने साठगाठ करून लुबाडण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचा शेतकर्‍यांचा आरोप आहे. पीक विमा योजना ही शेतकर्‍यांची फसवणूक करणारी योजना असून याकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरविली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकरी पिकविम्याची रक्कम भरतो. दरवर्षी शेतकर्‍यांचे काही ना काही नुकसान होते. पण शेतकर्‍यांना विम्याचा लाभ म्हणून काहीही मिळत नाही. ज्या शेतात सतत तीन वर्ष नुकसान झाले असेल किंवा त्या परिसराची आणेवारी सतत तीन वर्ष ५0 टक्क्यांपेक्षा कमी होत असेल त्याला पीक विमा योजनेचा लाभ देता येईल असे बोलले जाते. शेतकर्‍यांना पीक विमा काढण्याचे आवाहन केले आहे. खरीप हंगामात पूर, अतवृष्टी, रोग व किडीेच उत्पन्न नाहीसे झाल्यास याचे लाभ मिळणार असल्याचे सांगीतले. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभाग शेतकर्‍यांना आवाहन करते. त्यामुळे कृषी विभागाचे धोरण असेल तर शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यास निश्‍चित पीक विम्याचा लाभ मिळेल, अशी हमी देण्यात यावी. शेतकर्‍यांची फसवणूक व लुबाडणूक करून सर्वच मालामाल झाले आहेत व होत आहेत. विमा कंपनीने शेतकर्‍यांकरिता आखलेली पीकविमा योजना सुद्धा कृषी विभाग, शासन आणि विमा कंपनीद्वारे लुबाडण्याचीच सुनियोजित योजना असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.