२० वर्षांपासून प्लॉटांचे लिलाव थंडबस्त्यात

By Admin | Updated: September 17, 2015 02:19 IST2015-09-17T02:19:18+5:302015-09-17T02:19:18+5:30

येथे बाजार चौकातील अतिक्रमाणाच्या १९ प्लॉटांचा लिलाव महसूल विभाग तिरोडा यांनी केलेला होता.

Plot auctioned for over 20 years | २० वर्षांपासून प्लॉटांचे लिलाव थंडबस्त्यात

२० वर्षांपासून प्लॉटांचे लिलाव थंडबस्त्यात

मुंडीकोटा : येथे बाजार चौकातील अतिक्रमाणाच्या १९ प्लॉटांचा लिलाव महसूल विभाग तिरोडा यांनी केलेला होता. ते प्लॉट मुंडीकोटा येथील गरजू व्यक्तींना पाच वर्षांच्या लिजवर देण्यात आले होते. पण या बाबीला आज २० वर्षांचा काळ लोटूनही दुसऱ्यांदा लिलाव करण्यात आलेला नाही. मग हे प्लॉट कुणाचे? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे.
यात मुंडीकोटा ग्रा.पं. कार्यालय या प्लॉट धारकांकडून ग्रा.पं. ईमला कर वसुली करीत आहे. मग ते प्लॉट कुणाचे? ग्रा.पं.चे की महसूल विभागाचे, असा गंभीर प्रश्न मुंडीकोटावासी करीत आहेत. ज्या व्यक्तींना हे प्लॉट देण्यात आले होते, त्यांनी सुरवातीला मातीची घरे तयार करुन त्यामध्ये आपला व्यवसाय करीत होते. पण यावेळी मातीच्या घरांना पाडून त्या जागेवर दुसरे नवीन सिमेंटचे मजबूत घरे तयार करण्यात आले आहेत. तसेच काही जणांनी या घरांवर डबल माळा तयार केला आहे.
या घरांत मोठ्या थाटात आपला व्यवसाय करीत आहेत. ऐका पाठोपाठ दुसऱ्यांनी त्यांचे पाहून नवीन घरे तयार करण्याची ही एक योजना तयार केलेली आहे. या प्लॉटधारकांनी सिमेंटचे घरे तयार करण्याची मोहीम आखलेली आहे. ही घरे दुसऱ्याला भाड्यानेसुद्धा दिली आहेत व पैसा कमविण्याचा गोरखधंदा सुरु केलेला दिसत आहे. काहींनी आपल्या मालकीचे समजून कुणाला विचारपूस न करता सर्रास त्या प्लॉटची विक्री केलेली आहे. (वार्ताहर)

Web Title: Plot auctioned for over 20 years