गंगाबाई रूग्णालयात डुकरांचा शिरकाव
By Admin | Updated: May 12, 2014 23:50 IST2014-05-12T23:50:07+5:302014-05-12T23:50:07+5:30
संपूर्ण जिल्ह्यात महिला व बालकांसाठी केवळ एकच शासकीय रूग्णालय बाई गंगाबाई महिला रूग्णालय आहे. हे रूग्णालय जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे

गंगाबाई रूग्णालयात डुकरांचा शिरकाव
गोंदिया : संपूर्ण जिल्ह्यात महिला व बालकांसाठी केवळ एकच शासकीय रूग्णालय बाई गंगाबाई महिला रूग्णालय आहे. हे रूग्णालय जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे गोंदिया शहरात आहे. जिल्हाभरातील महिला व बालकांना येथे उपचारासाठी आणले जाते. परंतु या रूग्णालयाची दशा पाहून येथे येणार्यांना ‘हेच का ते एकमेव रूग्णालय’ असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सध्या या रूग्णालयाच्या आवारात डुकरे शिरकाव करीत आहेत. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातलगांना मोठाच त्रास होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बाई गंगाबाई महिला रूग्णालयात प्रसूतीसाठी गरोदर महिला दाखल होतात. त्यांच्यासह त्यांचे नातलगही येथे येतात. प्रसूती होईपर्यंत किमान दिवस नातलगांनाही येथे रहावे लागते. रोज सकाळी उठून आंघोळ करून कपडेही धुवावे लागते. मात्र शहरात फिरणारी मोकळी डुकरे आता गंगाबाई रूग्णालयात शिरकाव करू लागली आहेत. या प्रकाराकडे रूग्णालयाच्या अधिकारी वर्गांचे दुर्लक्ष आहे. डुकरांच्या हैदोसामुळे रूग्ण व त्यांचे नातलग त्रस्त होवून गेले आहेत. डुकरांनी त्रास देण्याचा सपाटा सुरू केला असून आता ही नित्याची बाब झाली आहे. डुकरांना पळविण्यासाठी या रूग्णालयात कसलीही व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे डुकरे या रूग्णालयाच्या आवारात बिनधास्तपणे फिरताना दिसतात. एकीकडे रूग्णाच्या नातलगांना रूग्णांच्या देखरेखीसाठी कसरत करावी लागते, तर दुसरीकडे आपले सामान-साहित्य डुकरांपासून वाचविण्यासाठी धावपळ करावी लागते. बाई गंगाबाई रूग्णालयात येणार्यांना डुकरांचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही, सद्यस्थितीत या रूग्णालयाची हीच स्थिती आहे. या प्रकाराकडे आरोग्य विभागाने व बाई गंगाबाई रूग्णालयाच्या जबाबदार अधिकार्यांनी तातडीने लक्ष देऊन डुकरांच्या आवागमनावर बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय रूग्णालयाचे आवार व परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी येथे भेट देणार्या रूग्णांच्या नातलगांनी केली आहे. (प्रतिनिधी)