दारू दुकानावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:00 IST2017-08-26T21:59:57+5:302017-08-26T22:00:11+5:30
आमगावच्या रिसामा येथील परवानाधारक देशी दारू दुकान कालांतराने पुन्हा सुरू झाली. यावेळी येथील महिलांनी दुकानावर हल्ला चढविला.

दारू दुकानावर दगडफेक
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : आमगावच्या रिसामा येथील परवानाधारक देशी दारू दुकान कालांतराने पुन्हा सुरू झाली. यावेळी येथील महिलांनी दुकानावर हल्ला चढविला. दुकानावर तुफान दगडफेक केली व दुकान बंद पाण्यासाठी पुढाकार घेतला.
रिसामा येथील दिनेश कटकवार यांची सरकार मान्यता देशी दारू विक्रीचे दुकान आहे. सदर दुकान लोकवस्तीत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हे दुकान लोकवस्ती बाहेर नेण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत. यासाठी महिलांनी अनेक आंदोलन केले. परंतु काही पुढाºयांनी याचे भांडवल केले. त्यामुळे हे देशी दारूचे दुकान दुसºया ठिकाणी स्थानांतरण झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेश नंतर विविध राष्टÑीय व राज्यमार्गावरील दारू विक्रीचे व्यवसाय बंद पडले. यात न्यायालयाने नियम घातले. यात रिसामा येथील देशी दारू दुकान काही काळासाठी बंद करण्यात आली होती. परंतु सदर दुकान उघडण्यासाठी प्रशासनाने दुकान परवानाधारक यांना मंजूरी दिली. त्यामुळे प्रभागातील महिलांचा आक्रोश उफाळून आला.
सदर दुकान उघडण्यासाठी २६ आॅगस्टला सकाळी ११ वाजता परवाना धारकाने द्वारे उघडले यावेळी रिसामा येतील महिलांनी एकत्रित येऊन दुकानावर जोरदार हल्ला चढवित दगडफेड केली. दुकानाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रिसामा येथे तणावाचे वातावरण आहे. यावेळी पोलीस प्रशासनाने तत्काळ दुकान बंद करून महिलांना बाहेर केले. यावेळी महिला दुकानावर जाण्यास मागे वळत नव्हत्या त्यामुळे तणाव वाढला होता.
देशी दारू दुकान बंद करण्याची मागणी धरून महिलांनी पोलीस ठाणे गाठून पोलीस प्रशासनावर जोरदार शाब्दीक प्रहार केला. यावेळी पोलीस निरीक्षक दसूरकर यांच्याशी महिलांची बाचाबाची झाली. महिलांनी दारू दुकान नकोच असा हट्ट धरला. त्यामुळे पोलीस ठाण्यातही तणाव निर्माण झाला होता. यावेळी पोलीस निरीक्षक दसुरकर यांनी महिलांना कायदेशीर लढा देऊन दारुबंदीसाठी पुढाकार घ्यावे तर कायदा हातात न घेण्याचा सल्ला दिला. महिलांना दारूबंदीसाठी लढा सुरू राहणार असे सांगत महिला पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्या.
भरवस्तीत देशी दारू दुकान नको म्हणून यासाठी लढणाºया महिला एकत्र आल्या. त्यांनी आक्रोश व्यक्त केला. त्यांना कायद्याने लढा असे सांगून ठाणेदार मोकळे होतात. महिलांनी गावातील कायदा सुव्यवस्था व शांतता भंग करण्यासाठी केलेला हा हल्ला असल्याचे दसुरकर म्हणाले. पोलीस प्रशासनावर दबाव आणता येणार नाही. कायदा राखण्यासाठी प्रतिबंधक कारवाई पुढे करू असे पोलीस निरीक्षक दासुरकर यांनी सांगितले.