स्पर्धा परीक्षेतून व्यक्तिमत्त्व विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 23:44 IST2018-09-27T23:44:00+5:302018-09-27T23:44:40+5:30

सध्याच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा केवळ स्पर्धा परीक्षेसाठी मर्यादित नसून यातून व्यक्तिमत्त्व विकास होत असल्याने ते उपयुक्त असल्याचा सल्ला विद्यार्थ्याना देवरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी दिला.

Personality Development in Competitive Examination | स्पर्धा परीक्षेतून व्यक्तिमत्त्व विकास

स्पर्धा परीक्षेतून व्यक्तिमत्त्व विकास

ठळक मुद्देराजेंद्र चिखलखुंदे : स्पर्धा परीक्षा व करियर जागृती अभियान, संस्थेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : सध्याच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा केवळ स्पर्धा परीक्षेसाठी मर्यादित नसून यातून व्यक्तिमत्त्व विकास होत असल्याने ते उपयुक्त असल्याचा सल्ला विद्यार्थ्याना देवरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी दिला.
स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयात दीनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी व आकार फाऊंडेशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा व करियर जागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व माता सरस्वती यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व विद्यापीठ गीताने कार्यशाळेला सुरूवात झाली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.अरुण झिंगरे,दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार, महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. वर्षा गंगणे, ग्रंथपाल चंद्रमणी गजभिये उपस्थित होते.
चिखलखुंदे यांनी स्पर्धा परीक्षा कशासाठी? स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा लागतो? स्पर्धा परीक्षेचे महत्व यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच स्वत: स्पर्धा परीक्षेची तयारी करुन मुख्याधिकारीपदापर्यंत कशी मजल मारली याचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला.
झिंगरे यांनी उपस्थित स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शन करताना जीवनातील मोठे स्वप्न बघून ते पूर्ण करण्याची क्षमता विद्यार्थ्यामध्ये असून ती जागृत करण्याची वेळ आता आली आहे. स्वप्न परिश्रमाने पूर्ण करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. लांजेवार यांनी प्रास्ताविकातून स्पर्धा परीक्षेविषयी जागृती अभियानाची आवश्यकता का? यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी प्रतिनिधी कुलदीप बघेल यांनी तर आभार विद्यार्थिनी प्रतिनिधी वंदना नेताम यांनी मानले. यशस्वीतेसाठी हषवर्धन मेश्राम, गोपाल चनाप, अरुण मानकर यांच्यासह महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Web Title: Personality Development in Competitive Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.