लोकअदालतीत सुटले ११७७ तंटे

By Admin | Updated: December 14, 2015 02:16 IST2015-12-14T02:16:18+5:302015-12-14T02:16:18+5:30

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरणाद्वारे राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी घेण्यात आली.

People lost 1177 shares | लोकअदालतीत सुटले ११७७ तंटे

लोकअदालतीत सुटले ११७७ तंटे

नरेश रहिले गोंदिया
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरणाद्वारे राष्ट्रीय लोक अदालत शनिवारी घेण्यात आली. या अदालतीत गोंदिया जिल्ह्यातील सहा न्यायालयांनी घेतलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत ११७७ प्रकरणे एकाच दिवश निकाली काढण्यात आली. जिल्हाभरात सर्वच प्रकारची ७ हजार २१ प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात आली होती.
गोंदिया जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील तालुका न्यायालयांनी तडजोडपात्र न्याय प्रविष्ठ व पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणांचा निपटारा केला. या राष्ट्रीय लोक अदालतीत विदर्भ कोकण ग्रामीण बँक, बँक आॅफ इंडिया, स्टेट बँक आॅफ इंडिया, महाराष्ट्र बँक, देना बँक, सेंट्रल बँक, युनियन बँक, बडोदा बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, जोतिबा फुले बिगर शेती सहकारी पतसंस्था यांची पूर्व न्यायप्रविष्ट प्रकरणे होती. तसेच न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. सडक-अर्जुनी न्यायालयात पुर्व न्यायप्रविष्ट ३४० प्रकरण ठेवले होते. त्यातून २० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्या प्रकरणांच्या तडजोडीतून २ लाख २६ हजार ४७२ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. न्यायप्रविष्ट १२८ प्रकरण ठेवले होते त्यातून ९८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला व १८०० रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले.
अर्जुनी-मोरगाव न्यायालयात पुर्व न्यायप्रविष्ट ५७९ प्रकरणे ठेवले होते. त्यातून ३९ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्या प्रकरणांच्या तडजोडीतून ३ लाख ६८ हजार ९१० रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. तर न्यायप्रविष्ट १२९ प्रकरणे ठेवले होते त्यातून ४८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातून सहा हजार ६०० रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. तिरोडा न्यायालयात पूर्व न्यायप्रविष्ट ४५४ प्रकरणे ठेवले होते. त्यातून १८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्या प्रकरणांच्या तडजोडीतून सात लाख ७४ हजार ३७० रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. न्याय प्रविष्ठ ४५२ प्रकरणे ठेवले होते त्यातून २९२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातून २ लाख ३८ हजार ९४ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. आमगाव न्यायालयात पुर्व न्यायप्रविष्ट ८४२ प्रकरणे ठेवले होते. त्यातून २३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्या प्रकरणांच्या तडजोडीतून २७ लाख ५४ हजार ९५८ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. न्यायप्रविष्ट १८२ प्रकरणे ठेवले होते त्यातून ६२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातून तीन हजार ५० रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले.
देवरी न्यायालयात पुर्व न्यायप्रविष्ट १२८८ प्रकरणे ठेवले होते. त्यातून सहा प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्या प्रकरणांच्या तडजोडीतून तीन लाख १९ हजार ४६३ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. न्याय प्रविष्ठ ११९ प्रकरणे ठेवले होते त्यातून ७४ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातून दोन लाख रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. गोंदिया न्यायालयात पुर्व न्यायप्रविष्ट १५४३ प्रकरणे ठेवले होते. त्यातून ६७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. असून तडजोडीतून १७ लाख २० हजार ९७६ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. न्याय प्रविष्ठ ९४४ प्रकरणे ठेवले होते त्यातून ४३० प्रकरणांचा निपटारा करून त्यातून २ लाख ९० हजार ८३९ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरले. गोंदिया जिल्ह्यात एकूण सात हजार २१ प्रकरण दाखल करण्यात आले. यातील ११७७ प्रकरणाचा निपटारा करून ६९ लाख ५९ हजार ५३२ रूपये पक्षकाराला देण्याचे ठरवून हे प्रकरण निकाली काढण्यात आले. लोकअदालतीत तंटे सोडविण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनीही सहकार्य केले.

वैवाहिकांची २० प्रकरणे निकाली
पती-पत्नीचे अनेक प्रकरण या राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यात आले होते. यातील २० प्रकरण सुटले आहेत. तिरोडा न्यायालयाने सात प्रकरण दाखल केले असून एका प्रकरणाचा निपटारा झाला. गोंदियाने ८० प्रकरण ठेवले होते यातील सात प्रकरणांचा निपटारा झाला. आमगाव न्यायालयाने ५४ प्रकरणे ठेवले होते. त्यातील नऊ प्रकरणांचा निपटारा झाला. सडक-अर्जुनीने सहा प्रकरण ठेवले होते परंतु निपटारा होऊ शकला नाही. अर्जुनी-मोरगाव न्यायालयाने १६ प्रकरण ठेवले होते त्यातील तीन प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. देवरी न्यायलयाने एकही प्रकरण या प्रकारचे ठेवले नव्हते.
१० पॅनल मध्ये हे होते न्यायाधीश
प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश मु.ग. गिरटकर यांच्या मार्गदर्शनात गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. या अदालतीत गोंदियात पाच पॅनल तर प्रत्येक तालुकास्तरावर एक पॅनल होती. गोंदिया येथील पॅनलमध्ये सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सी.पी. चौधरी, मुख्य न्यायदंडाधिकारी पी.एच. खरवडे, ईशरत शेख/नाजीर, पी.बी. भोसले, ए.बी.तहसीलदार, आमगावचे ए.डी. रामटेके, आर.के. पुरोहीत, तिरोडाचे आर.एस. पाजणकर,एस.डी. सावरकर, देवरीचे एस.जे. भट्टाचार्य, सडक-अर्जुनीचे व्ही.ए.साठे, अर्जुनी-मोरगाव येथे बी.एम. कार्लेकर, कामगार न्यायालयात मेश्राम, सहायक धर्मादाय आयुक्त रेहपाडे यांचा समावेश होता.

Web Title: People lost 1177 shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.