भागवत महापुराणातील कृष्णलीला ऐकून मिळणारी शांती अतुलनीय ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:24 IST2021-01-14T04:24:33+5:302021-01-14T04:24:33+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चिचोली (जुनी) येथील फुलनबाई श्रीराम रहांगडाले यांच्यावतीने सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञाच्या सात दिवसीय ...

भागवत महापुराणातील कृष्णलीला ऐकून मिळणारी शांती अतुलनीय ()
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील चिचोली (जुनी) येथील फुलनबाई श्रीराम रहांगडाले यांच्यावतीने सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञाच्या सात दिवसीय सप्ताहानिमित्ताने ते बोलत होते. या भागवत महापुराण सप्ताहाची सुरुवात ६ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आली. यावेळी संजय श्रीराम रहांगडाले, अविनाश रहांगडाले, दिनेश पाटील रहांगडाले, फुलनबाई रहांगडाले, राणीबाई बिसेन, प्राचार्य नरेंद्र काडगाये, गुणेश काडगाये, बंडू रहांगडाले, आनंदराव तिरगम, माधोराव काळे व गावातील भक्तमंडळींच्या उपस्थितीत घटस्थापना आणि भागवत महापुराण ज्ञानयज्ञाची सुरुवात करण्यात आली. या सात दिवसीय भागवत महापुराण सप्ताहाच्या दरम्यान दररोज भगवान कृष्णाने केलेल्या लीला कथा, कृष्ण-सुदामा भेट, कृष्ण-रुक्मिणी विवाह, सांख्य योग, कर्मयोग, दिव्यज्ञान, कृष्णभावना भाविक कर्म, भगवत ज्ञान, कृष्णभक्ती योग, विश्वरूप दर्शन, प्रकृती पुरुष आणि चेतना, त्रिगुणमयी माया, पुरुषोत्तम योग इत्यादी विषय घेऊन प्रत्यक्ष देखावे यांच्या माध्यमातून सात दिवस भागवत महापुराण कथन करण्यात आले. या कार्यक्रमाचा गावातील भक्तमंडळी आणि परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.