बनाथर खुनातील आराेपींना २८ पर्यंत पीसीआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST2021-07-28T04:30:29+5:302021-07-28T04:30:29+5:30

गोंदिया: रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बनाथर येथील नेहमी दारू पिऊन मोहल्ल्यातील लोकांना शिवीगाळ करणाऱ्या कैलास भजनदास मोरध्वज (४०) रा. ...

PCR to 28 accused in Banathar murder | बनाथर खुनातील आराेपींना २८ पर्यंत पीसीआर

बनाथर खुनातील आराेपींना २८ पर्यंत पीसीआर

गोंदिया: रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बनाथर येथील नेहमी दारू पिऊन मोहल्ल्यातील लोकांना शिवीगाळ करणाऱ्या कैलास भजनदास मोरध्वज (४०) रा. बनाथर याला २४ जुलैच्या दुपारी ३ वाजता बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात पाच जणांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी सतीश जयलाल ठाकरे (४५), राजेश कुवरलाल सरवरे (३५), रतिराम होलीराम बिनाखे (६०), सुरेश रतिराम बिनाखे (३५) सर्व रा. बनाथर व मोतीराम होलीराम बिनाखे (४८) रा. चंगेरा या पाच जणांनी त्याला लाथाबुक्क्यांनी घरात घुसून बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या कैलासला उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता २५ जुलै रोजी पहाटे १.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी पाच आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३०२, ४५०,३२३, ३२४, १४१,१४३,१४७, १४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक केल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे करीत आहेत.

Web Title: PCR to 28 accused in Banathar murder