कपात केलेले तीन दिवसांचे वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST2020-03-09T06:00:00+5:302020-03-09T06:00:05+5:30
राज्य कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने प्रलंबित अनेक मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ७, ८ व ९ ऑगस्ट २०१८ रोजी तीन दिवसीय आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे समर्थन होते. म्हणून जिल्ह्यातील शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल शासनाने घेवून ९ ऑगस्ट २०१८ ला चर्चा केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते.

कपात केलेले तीन दिवसांचे वेतन द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रलंबित मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनांतर्गत कपात केलेले तीन दिवसांचे वेतन देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. यासाठी संघाकडून शासनाला पत्र पाठवून वेतनाची मागणी करण्यात आली आहे.
राज्य कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने प्रलंबित अनेक मागण्यांसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ७, ८ व ९ ऑगस्ट २०१८ रोजी तीन दिवसीय आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे समर्थन होते. म्हणून जिल्ह्यातील शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाची दखल शासनाने घेवून ९ ऑगस्ट २०१८ ला चर्चा केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते. या तीन दिवसांचे वेतन कपात करण्यात येणार नाही अशी हमी शासनाने दिली होती. परंतु जिल्ह्यातील संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात आले. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
या तीन दिवसाचे वेतन काढण्यात यावे यासाठी राज्य कर्मचारी समन्वय समिती व प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने महाराष्ट्र शासनाला निवेदन देवून चर्चा केली आहे. त्या अनुषंगाने संदर्भाकित पत्रान्वये संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता असाधारण रजा नियमित केली आहे. परंतु या पत्राद्वारे सेवा खंडीत होणार नाही, परंतु तीन दिवसाचे वेतन देय झाले नाही. तरी ,जिल्ह्यातील सर्व कर्मचाºयांचे संपकालीन कालावधीतील तीन दिवसांचे वेतन द्यावे अशी मागणी शिक्षक संघाने केली आहे.