डॉक्टरच्या हलगर्जीमुळे रुग्णाचा मृत्यू
By Admin | Updated: May 11, 2014 23:50 IST2014-05-11T23:50:04+5:302014-05-11T23:50:04+5:30
पिपरटोला येथील अरुण दौलत मारगाये (२१) या तरूणाचा उपचारादरम्यान शनिवारी सायंकाळी ६ वाजता मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीमुळे अरूणचा मृत्यू झाल्याचा ....

डॉक्टरच्या हलगर्जीमुळे रुग्णाचा मृत्यू
गोंदिया : पिपरटोला येथील अरुण दौलत मारगाये (२१) या तरूणाचा उपचारादरम्यान शनिवारी सायंकाळी ६ वाजता मृत्यू झाला. डॉक्टरच्या हलगर्जीमुळे अरूणचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरने उपचार करण्यात हलगर्जी केल्यामुळे अरूणचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉक्टरवर कारवाई करण्याचा मागणीवर जोर दिला. केटीएस येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल परियाल यांनी सालेकसा येथे जाऊन नातेवाईकांची समस्या ऐकली. डॉ. परियाल यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ. बी.डी. जायस्वाल व आमगाव येथील डॉ. उपाध्याय यांनी व्हिडिओ चित्रीकरणात उत्तरीय तपासणी केली. अरुणची प्रकृती खालावल्याने बुधवारी सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. प्रमोद गवई ड्यूटीवर होते. शनिवारी अरुणची प्रकृती चांगलीच खालावली व त्यावर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी ६ वाजतापासून रविवारी सकाळपर्यंत मृतदेह नातेवाईकांनी उचलला नाही. आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतरच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवू असा अट्टाहास नातेवाईकांनी धरला. या संदर्भात डॉ. अमित ढोक यांच्याशी या घटनेसंदर्भात विचारणा केल्यावर अरूण मारगायेला ताप आला होता व त्याला डायरिया झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नामदेव किरसान, राकेश शर्मा, मूलचंद गावराने यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)