रुग्ण वाढीचा वेग कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 05:00 IST2020-08-28T05:00:00+5:302020-08-28T05:00:39+5:30
कोरोना संसर्ग वाढत असल्याने आरोग्य व जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग तिप्पट झाल्याने २७ ऑगस्टपर्यंत ९५९ हून अधिक रुग्ण आढळले आहे.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गुरूवारी आढळलेल्या ६५ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ५१ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत.

रुग्ण वाढीचा वेग कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून गोंदिया शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. गोंदिया शहरात मागील ४८ तासात १०२ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गुरूवारी (दि.२७) ६५ कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना अॅक्टीव्ह रूग्णांचा आकडा ४३२ वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम आहे. आतापर्यंत एकूण १२४८ कोरोना बाधित आढळले आहे.७८३ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. तिरोडा तालुक्यातील एका कोरोना बाधिताचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने जिल्ह्यात कोरोनाचा १६ वा बळी गेला आहे.
कोरोना संसर्ग वाढत असल्याने आरोग्य व जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग तिप्पट झाल्याने २७ ऑगस्टपर्यंत ९५९ हून अधिक रुग्ण आढळले आहे.कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गुरूवारी आढळलेल्या ६५ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक ५१ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत.
गोंदिया शहरातील बाजपेयी वार्ड, झोपडपट्टी मोहल्ला येथील प्रत्येकी एक रुग्ण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील दोन रुग्ण, सिव्हिल लाईन येथील दोन, कुंभारेनगर येथील पाच, गौतमनगर येथील दोन, आंबाटोली येथील दोन, सेलटॅक्स कॉलनी येथील दोन, रामनगर येथील एक,शास्त्री वॉर्डातील तीन, सुभाष वॉर्डातील एक,रिंग रोड वरील तीन, पंचायत समिती कॉलनी येथील एक, कुडवा येथील सहा, नवरगाव येथील एक, अंभोरा रावणवाडी येथील एक, मास्टर कॉलनी येथील एक, कस्तुरबा वॉर्ड येथील एक, गांधीवार्ड येथील एक, धापेवाडा येथील एक,न्यू लक्ष्मीनगर येथील एक, नागरा येथील एक, चारगाव येथील एक, राजाभोज कॉलनी येथील एक, मरारटोली येथील एक, पाल चौक येथील एक, वीर सावरकर वॉर्ड दोन, गणेशनगर येथील एक, रेलटोली येथील एक आणि एक रुग्ण प्रताप वॉर्डातील आहे.
तिरोडा तालुक्यातील डोंगरगाव, बेरडीपार, खैरबोडी येथील एक, खडकी येथील दोन, तिरोडा शहरातील सुभाष वॉर्ड व संत कबीर वॉर्ड येथील प्रत्येकी एक, शहीद मिश्रा वॉर्डातील चार, तिरोडा शहरातील एक रु ग्ण आहे.
आमगाव तालुक्यातील तिगाव येथील एक, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बुधेवाडा येथील एक रुग्ण असे एकूण ६५ रुग्ण आढळून आले. तर तिरोडा येथील एका ४८ वर्षीय रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
१३६०१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत गोंदिया येथील प्रयोगशाळेत एकूण १५ हजार २९७ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी १३ हजार ६०१ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १२३० नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. २८३ स्वॅब नमुन्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे. ४४९ नमुन्यांचा अहवाल अद्याप अनिश्चित आहे.