पाच वर्षापासून रखडले १२८९ घरकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:27+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यात इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजनेतील एकूण एक हजार २८९ घरकूल मागील पाच वर्षांपासून अडकून आहेत. त्यांना घरकुल बांधकामाचा निधी देण्यात आला नाही. आज-उद्या निधी मिळेल या आशेवर लाभार्थी फख्त कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.

For the past five years, 1289 houses have been kept | पाच वर्षापासून रखडले १२८९ घरकूल

पाच वर्षापासून रखडले १२८९ घरकूल

ठळक मुद्देजि.प. सदस्यांचा पाठपुरावा : सडक-अर्जुनी तालुक्यातील लाभार्थी आशेवरच

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सडक-अर्जुनी तालुक्यात इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना व शबरी आवास योजनेतील एकूण एक हजार २८९ घरकूल मागील पाच वर्षांपासून अडकून आहेत. त्यांना घरकुल बांधकामाचा निधी देण्यात आला नाही. आज-उद्या निधी मिळेल या आशेवर लाभार्थी फख्त कार्यालयाच्या चकरा मारत आहेत.
सन २०१५-१६ या वर्षातील इंदिरा आवास योजनेतील ७०, सन २०१७-१८ वर्षातील १०२, सन २०१८-१९ वर्षातील ११० घरकुलांचे काम झाले नाही. सन २०१६-१७ वर्षातील प्रधानमंत्री आवास योजनेतील ३४, सन २०१७-१८ वर्षातील ५६, सन २०१८-१९ वर्षातील ११६, सन २०१९-२० वर्षातील ७७८ घरकुलांचे काम झाले नाही. सन २०१६-१७ वर्षातील शबरी आवास योजनेतील दोन, सन २०१७-१८ वर्षातील ११, सन २०१८-१९ वर्षातील २० घरकुलांचे काम झाले नाही. अशाप्रकारे चारही योजनांतील एक हजार २८९ घरकुल पूर्ण झाले नाही.
या लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला नसल्याने हे कुटुंब उघड्यावर आहेत. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी सतत पाठपुरावा केला आहे.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत अनेकदा प्रश्न उपस्थिततरून लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

दोषींवर कारवाई करा
गोरगरिबांसाठी या योजना राबविल्या जातात. अन्न, वस्त्र व निवारा यापासून कुणीही वंचीत राहू नये म्हणून शासनाची धडपड दिसून येते. परंतु जिल्ह्यातील हजारो कुटुंबांना गरजेनुसार घरकुल मंजूर होऊनही त्यांना निधी न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी ज्या ठिकाणी घरकुलाचा पाया उभा करण्यात आला ती जागाही गुंतून आहे. अशात संबंधितांवर कारवाई करा अशी मागणीही परशुरामकर यांनी केली आहे.

Web Title: For the past five years, 1289 houses have been kept

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.