पालकांनी शाळेविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:03+5:302021-01-13T05:15:03+5:30
अर्जुनी-मोरगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीच्या दृष्टीकोनातून बालक, पालक व शिक्षक यांच्या समन्वयाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील ...

पालकांनी शाळेविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा
अर्जुनी-मोरगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीच्या दृष्टीकोनातून बालक, पालक व शिक्षक यांच्या समन्वयाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा नेहमीच प्रयत्नशील असते. परंतु पालकांनीसुद्धा शाळेला सहकार्य करून शाळेविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा, असे प्रतिपादन जीएमबी इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य वीना नानोटी यांनी केले.
वर्ग दहावीच्या पालक - शिक्षक सभेत अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे सचिव अनिल मंत्री, पालक पाहुणे म्हणून रवी मेश्राम व रचना बोरकर उपस्थित होते. आपल्याला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यास आणि मेहनत या दोन गोष्टींची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन मंत्री यांनी केले. भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांच्या पालकांना येणाऱ्या अभ्यास विषयक अडचणी, मासिक व सराव परीक्षांचे आयोजन, एका बेंचवर दोन विद्यार्थ्यांना बसविणे, मास्क लावणे अनिवार्य, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, आजारी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविणे, शाळा दररोज सॅनिटाईझ करणे इत्यादी विषयांवर चर्चा करून सर्व ठराव पालकांनी एक मताने पारित करून सभेत मंजुरी दिली. सभेला ५० पालकांची उपस्थिती होती. शाळेचे पर्यवेक्षक मुकेश शेंडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन करून लीना मिसार यांनी आभार मानले. सभेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.