अंगणवाडी सेविकांवर कागदी घोड्यांचा भार
By Admin | Updated: December 27, 2014 22:54 IST2014-12-27T22:54:18+5:302014-12-27T22:54:18+5:30
चिमुकल्या मुलांचे प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यापूर्वी त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे काम अंगणवाडी केंद्रामधून होते. परंतु या मूळ उद्देशाला बाजूला सारून अंगणवाडी सेविकांवर अनेक

अंगणवाडी सेविकांवर कागदी घोड्यांचा भार
गोंदिया : चिमुकल्या मुलांचे प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यापूर्वी त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे काम अंगणवाडी केंद्रामधून होते. परंतु या मूळ उद्देशाला बाजूला सारून अंगणवाडी सेविकांवर अनेक कामे लादल्या जात आहेत. तुटपुंज्या मानधनावर त्यांना ही सगळी कामे करावी लागत असल्यामुळे सेविकांत असंतोष वाढला आहे.
शासनाच्या शैक्षणिक योजनेंतर्गत अंगणवाडीमध्ये लहान मुलांना बोलके करण्याकरिता व अक्षर ओळख करण्याकरिता आंगणवाडी सेविका काम करीत आहेत. केंद्र व राज्यशासन मिळून अंगणवाडी सेविकेला पाच हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकेला २ हजार ४५० रुपए, अंगणवाडी मदतनिसांना २ हजार ५०० रुपये मानधन दरमहा दिले जात आहे. मात्र शिकवणीच्या कामाव्यतिरीक्त अंगणवाडी सेविकेला आरोग्य विभागाशी संबंधित सर्वेक्षणाची व अन्य कामे दिली जात आहेत. वेळोवेळी बाहेरगावी सभा, मेळाव्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सेविकेला मुलांना सांभाळणे व त्यांना आवश्यक असणाऱ्या प्राथमिक शिक्षणाच्या कामात बाधा येत आहे. अंगणवाडीमुळे मुलांमधील कुपोषितपणा दूर करण्यास मोठी मदत होत आहे.
मात्र आंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामाव्यतिरीक्त दर महिन्याला इतर कामे करावी लागत असल्याने कुपोषणमुक्तीच्या उद्देशाला हरताळ फासली जात आहे