आमचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करु असे आश्वासन केंद्रातील मोदी सरकारने दिले होते. सत्तेवर येवून चार वर्षांचा कालावधी लोटत आहे. मात्र १५ लाख रुपये सोडा १५ रुपये सुद्धा नागरिकांच्या बँक खात्यात जमा झाले नाही ...
भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान होत आहे. केवळ दहा दिवस मतदानाला असताना मतदार मात्र गप्प आहे. नेत्यांमध्ये मात्र उत्साह दिसून येत आहे. भरउन्हातही तुमसरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते ‘डोअर ...
पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज झाली असून यासाठी शासनाकडून विविध प्रयोग केले जात आहेत. आता पावसाळा जवळच असल्याने शासनाकडून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ...
मागील आठवडाभरापासून शहरवासीयांना गढूळ पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. ...
तालुक्यातील नागरिकांना उत्तम रुग्णसेवा देण्यासाठी नाव लौकिक करणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाला रिक्त पदांमुळे रुग्णसेवा अधोगतीला जाण्याची वेळ आली आहे. शासनाच्या विविध योजनांतून रुग्णेसेवेसाठी नागरिकांना खाजगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. ...
केंद्र व राज्यात जनतेला मोठी आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने मागील चार वर्षांत कुठलेच ठोस काम केले नाही. केवळ विविध योजनांची नाव बदलविण्यापलीकडे काहीच केले नाही. महागाई नियंत्रणात आणू, रोजगार देऊ, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबविणार अशी ...
दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. तर पांरपारिक पिकांच्या लागवडीमुळे उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे घाट्याचा सौदा होत आहे. ...
स्वत:च सिंचनाची सोय उपलब्ध करुन रब्बी हंगामात धानाचे पीक घेऊन दिवसरात्र राबणारा शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने खासगी व्यापाऱ्यांच्या दारात उभा असल्याचे चित्र आहे. गरजेपोटी शेतकऱ्यांना कमी भावाने धानाची विक्री करावी लागत आहे. ...
रोजगार हमी योजना विभागाच्या केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिव अपराजिता सारंगी या दोन दिवसाच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. या दरम्यान त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी देऊन पाहणी केली. या योजनेवर काम करीत असलेल्या ...
तालुक्यातील दल्ली परिसरात वनतलावाची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे; मात्र अद्यापही ती मार्गी लागली नाही. त्यामुळे शशीकरण पहाडीजवळ वनतलाव केव्हा होणार असा सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे. ...