गोंदिया-भंडारा लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी सोमवारी (दि.१८) शहरातील प्रमुख मार्गांवर पथसंचलन केले. या पथसंचलनात ४३ अधिकारी, ४९१ कर्मचारी व गृहरक्षक दलातील ५० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. ...
शासकीय कामात हलगर्जीपणा किंवा अनागोंदी काम करणाऱ्यांना निलंबनाचा सामना करावा लागतो. येथील मिनी मंत्रालयातून चालणाऱ्या कारभारात अशीच अनागोंदी करणाऱ्यांना जिल्हा परिषदेने झटका दिला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण १३ विभागांपैकी तब्बल सहा विभागातील ४० कर्मच ...
जगात क्षयरूग्णांच्या संख्येत आपला देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. ४० टक्के लोकांना क्षयरोगाच्या जंतूची बाधा झालेली असते. देशातील ५ हजार लोकांना नव्याने क्षयरोग होत आहे. क्षयरूग्णांनी संपूर्ण कालावधीत उपचार केल्यास क्षयरोग संपूर्ण बरा होतो असे प्रतिपादन ज ...
जंगल व वन्य जीवांच्या संरक्षणासाठी शासनाने वन विभाग स्थापन करून त्यात हजारो कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कामाचा भार वाढला असल्यामुळे जंगल संरक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी जंगल तोड ...
शहरात वाढत असलेल्या वाहतूकीच्या समस्येवर वाहतूक विभाग एक ना एक नवनवीन उपक्रम राबवून आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत असतानाच शहरात मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची समस्या वाढतच चालली आहे. ...
आपला देश स्वच्छ राहावा यासाठी गावापासून ते पुढे नगर व महानगरांपर्यंत शासनाकडून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत स्वच्छतेचे सर्वेक्षण करून रँकींग दिली जात आहे. यात काही शहरांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. ...
संघटन शक्तीपुढे काहीच अशक्य नाही याचे मूर्त उदाहरण तालुक्यातील ग्राम हिरडामाली येथे बघावयास मिळत आहे. लोकसहभागातून येथील प्राथमिक शाळेचा कायापालट करण्यात आला असून प्राथमिक विभागातील आंतरराष्ट्रीय दर्जाची ही पहिली प्राथमिक शाळा ठरली आहे. ...
खेळातून तरूणांचा विकास व्हावा या उद्देशातून येथे ६.१४ हेक्टर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले. आतापर्यंत २१ कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलात तब्बल ३ कोटी २० लाख ३० हजार रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बॅ ...
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे जुन्याच आर्थिक वर्षांतील कामांचा मजुरांना आधार होत आहे. ...