शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

बाजार समितीत धानाची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 6:00 AM

बाजार समिती व्यापारी आपल्या मर्जीने भाव देतात.त्यातही धानाचा प्रकार व गुणवत्ता बघून आधारभूत किंमती पेक्षा कमी भाव मिळत असल्याने आताचा शेतकरी बाजार समितीत आपले धान विकण्यासाठी घेऊन जाण्यापेक्षा थेट आधारभूत धान खरेदी केंद्रावर नेत आहेत. हेच कारण आहे की, येथील बाजार समितीत धानाची आवक घटल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देधान चालले केंद्रांवर : बाजार समित्यांत नाममात्र खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : धान खरेदीचा ऐन हंगाम सुरू असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोजकेच धान विक्रीसाठी येत आहे. कधी चार हजार ते पाच हजार पोती धानाची खरेदी होत असलेल्या बाजार समितीत आजघडीला हजार-पंधराशे पोत्यांची आवक होत आहे. यावरून धान आधारभूत धान खरेदी केंद्रांवर जात असल्याचे दिसत आहे.परिणामी येथील बाजार समितीत धानाची आवक घटली आहे.बाजार समिती व्यापारी आपल्या मर्जीने भाव देतात.त्यातही धानाचा प्रकार व गुणवत्ता बघून आधारभूत किंमती पेक्षा कमी भाव मिळत असल्याने आताचा शेतकरी बाजार समितीत आपले धान विकण्यासाठी घेऊन जाण्यापेक्षा थेट आधारभूत धान खरेदी केंद्रावर नेत आहेत. हेच कारण आहे की, येथील बाजार समितीत धानाची आवक घटल्याची माहिती आहे. येथील बाजार समिती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असूनही आजघडीला पुर्वीसारखी चहल-पहल दिसून येत नाही.कधी धान खरेदीच्या हंगामात चार ते पाच हजार पोत्यांची दररोजची खरेदी होत असलेल्या बाजार समिती आज हजार-पंधराशे पोते धान खरेदी होत आहे. विशेष म्हणजे, त्यातही बाजार समितीत येणारा धान ‘ए’ ग्रेडचा असून जाडा धान धान खरेदी केंद्रांवर शेतकरी नेत असल्याचे दिसत आहे.हेच कारण आहे की, कधी शेतकऱ्यांच्या गर्दीने फुगून राहणारी बाजार समिती आज ओस पडली आहे.बाजार समित्या अडचणीतशेतकऱ्यांना जेथे चांगले भाव मिळणार तेथे शेतकरी आपले धान विकण्यासाठी नेतात. याचाच फटका बाजार समित्यांना बसत आहे. आज सर्वच प्रकराचे खर्च वाढत जात असताना धानाची आवक मंदावल्याने बाजार समित्या ओस पडल्या आहेत. धानाची आवक नसल्याने बाजार समित्यांचे उत्पन्न घटत चालले असून खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत. बाजार समित्या अडचणीत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड