Paddy arrivals declined in the Market Committee | बाजार समितीत धानाची आवक घटली
बाजार समितीत धानाची आवक घटली

ठळक मुद्देधान चालले केंद्रांवर : बाजार समित्यांत नाममात्र खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : धान खरेदीचा ऐन हंगाम सुरू असताना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोजकेच धान विक्रीसाठी येत आहे. कधी चार हजार ते पाच हजार पोती धानाची खरेदी होत असलेल्या बाजार समितीत आजघडीला हजार-पंधराशे पोत्यांची आवक होत आहे. यावरून धान आधारभूत धान खरेदी केंद्रांवर जात असल्याचे दिसत आहे.परिणामी येथील बाजार समितीत धानाची आवक घटली आहे.
बाजार समिती व्यापारी आपल्या मर्जीने भाव देतात.त्यातही धानाचा प्रकार व गुणवत्ता बघून आधारभूत किंमती पेक्षा कमी भाव मिळत असल्याने आताचा शेतकरी बाजार समितीत आपले धान विकण्यासाठी घेऊन जाण्यापेक्षा थेट आधारभूत धान खरेदी केंद्रावर नेत आहेत. हेच कारण आहे की, येथील बाजार समितीत धानाची आवक घटल्याची माहिती आहे. येथील बाजार समिती जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असूनही आजघडीला पुर्वीसारखी चहल-पहल दिसून येत नाही.
कधी धान खरेदीच्या हंगामात चार ते पाच हजार पोत्यांची दररोजची खरेदी होत असलेल्या बाजार समिती आज हजार-पंधराशे पोते धान खरेदी होत आहे. विशेष म्हणजे, त्यातही बाजार समितीत येणारा धान ‘ए’ ग्रेडचा असून जाडा धान धान खरेदी केंद्रांवर शेतकरी नेत असल्याचे दिसत आहे.हेच कारण आहे की, कधी शेतकऱ्यांच्या गर्दीने फुगून राहणारी बाजार समिती आज ओस पडली आहे.

बाजार समित्या अडचणीत
शेतकऱ्यांना जेथे चांगले भाव मिळणार तेथे शेतकरी आपले धान विकण्यासाठी नेतात. याचाच फटका बाजार समित्यांना बसत आहे. आज सर्वच प्रकराचे खर्च वाढत जात असताना धानाची आवक मंदावल्याने बाजार समित्या ओस पडल्या आहेत. धानाची आवक नसल्याने बाजार समित्यांचे उत्पन्न घटत चालले असून खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत. बाजार समित्या अडचणीत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Paddy arrivals declined in the Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.