२२ रुग्णांची पडली भर १६नी केली मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:47+5:302021-01-13T05:16:47+5:30
गोंदिया : जिल्ह्यात कोराेना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, कोराेनाला आता उतरती कळा लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. ...

२२ रुग्णांची पडली भर १६नी केली मात
गोंदिया : जिल्ह्यात कोराेना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, कोराेनाला आता उतरती कळा लागल्याचे दिलासादायक चित्र आहे. मंगळवारी जिल्ह्यात २२ नवीन रुग्णांची भर पडली, तर १६ बाधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सद्यस्थितीत २५९ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे.
मंगळवारी जिल्ह्यात आढळलेल्या २२ रुग्णांमध्ये सर्वाधिक १३ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहे. तिरोडा २, गोरेगाव ३, देवरी १, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १ आणि बाहेरील राज्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यात आता कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने ५९,४७० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४७,९९७ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात असून, याअंतर्गत ६१,९२३ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ५५,९१६ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३,९५० कोरोनाबाधित आढळले असून, यापैकी १३,५११ जणांनी मात केली आहे. सद्यस्थितीत २५६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून, १५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.