संघटनात्मक शक्ती हीच विजयाची गुरुकिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST2021-07-29T04:29:14+5:302021-07-29T04:29:14+5:30

गोंदिया : जिल्हा बहुजन समाज पार्टी बसपा प्रदेश सचिव प्रा.दिनेश गेडाम व जिल्हा प्रभारी प्रभारी विलास राऊत यांच्या नेतृत्वात ...

Organizational strength is the key to victory | संघटनात्मक शक्ती हीच विजयाची गुरुकिल्ली

संघटनात्मक शक्ती हीच विजयाची गुरुकिल्ली

गोंदिया : जिल्हा बहुजन समाज पार्टी बसपा प्रदेश सचिव प्रा.दिनेश गेडाम व जिल्हा प्रभारी प्रभारी विलास राऊत यांच्या नेतृत्वात बसपाचे जिल्हा सचिव तथा गोरेगाव-तिरोडा विधानसभा प्रभारी भीमराव साखरे, उपाध्यक्ष अशोक बावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती गटनिहाय घर घर बसपा अभियान नुकतेच कुऱ्हाडी जिल्हा परिषद क्षेत्रात व पाथरी पंचायत समिती क्षेत्रातून सुरू करण्यात आले.

यावेळी परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, प्रा.दिनेश गेडाम म्हणाले, संघटनात्मक शक्तीशिवाय कोणत्याही संघर्षात विजय मिळविता येत नाही. म्हणून बहुजन महापुरुषांची पवित्र विचारसरणी यशस्वी करण्यासाठी बसपाचे जनकल्याणकारी धोरण व विचारधारा गाव-खेड्यातील प्रत्येक घरोघरी पोहोचवून तरुण, महिला, वडीलधाऱ्यांना जोडून संघटनेचे सामर्थ्य वाढविण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे सांगितले. रामेश्वर लांजेवार, धम्मदीप कुंभारे, प्रतीक गणवीर, प्रभुदास नंदेश्वर, शैलेश साखरे, अरुण पांचे, युगल किशोर बन्सोड, श्यामराव मडावी, बेनिराम राऊत, रमाकांत मरसकोल्हे, सारीपुत्त साखरे, शिवकुमार गायकवाड, कोमल उके, प्रेमलाल वालदे, रवींद्र खडसे, पाथरी भागातील सतीश बडोले, दिनेश साखरे, प्रकाश टेंभुर्णीकर, नितीन शहारे, जयेंद्र फसारे उपस्थित होते.

Web Title: Organizational strength is the key to victory