कारागृहात बंदीजनांच्या परिश्रमातून फुलतेय सेंद्रिय शेती
By Admin | Updated: November 14, 2016 00:19 IST2016-11-14T00:19:51+5:302016-11-14T00:19:51+5:30
येथील मध्यवर्ती कारागृृहातील बंदीजनांच्या परिश्रमातून सेंद्रिय शेती फुलत आहे.

कारागृहात बंदीजनांच्या परिश्रमातून फुलतेय सेंद्रिय शेती
आॅनलाईन खरेदीमुळे दलालांची कोंडी: प्रत्येक सातबाराची होणार तपासणी
सालेकसा : यंदापासून शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदी आॅनलाईन करण्यात आलेली असून आता सातबाऱ्यावर खरी नोंद असल्याप्रमाणेच धान खरेदी केली जाईल. केंद्रावर धान विक्री करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्याची प्रथम नोंदणी केली जाईल व त्यानंतर त्या सातबाऱ्याची शासकीय रेकार्डप्रमाणे महसूल विभागात नोंद असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्याची पडताळणी केली जाईल. त्यामुळे सातबारा खोडतोड करणारे किंवा खोटा सातबारा बनवून वाटेल तेव्हा विक्री करणारे दलाल जाळ्यात सापडल्याशिवाय राहणार नाही.
आदिवासी सेवा सहकारी संस्था अंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर आदिवासी शेतकऱ्यांचे निर्धारित भावात धान खरेदीसाठी सोय केली जाते. परंतु शासनाची दिशाभूल करीत काही व्यापारी व दलाल शेतकऱ्यांचे धान पडक्या भावात खरेदी करुन व त्यांचे सातबारा मागून त्यांचेच धान आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री करण्याचे काम करीत राहिले. तसेच या दलालांकडे धानाचा सात बाऱ्यावर आणखी सातबाऱ्यांची गरज पडल्यास खोटे सातबारा उतारा तयार केले. किंवा खऱ्या सातबाऱ्याची खोडतोड करुन त्यात जमिनीचे प्रमाण वाढविण्याचा गोरखधंदा व्यापारी वर्गाने चालविला आहे. परंतु आता खोटा सातबारा मुळीच चालणार नसून याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता वाढली आहे. मात्र धान खरेदी केंद्रांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करुन सातबाराधारक शेतकऱ्यांचे धान खरेदी करुन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव देण्याचे काम केले पाहिजे. (तालुका प्रतिनिधी)
एकदाच करावी लागणार सातबाराची नोंद
धान विक्री झालेल्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्याची नोंद एकदाच करावी लागणार असून प्रति हेक्टर ३० क्विंटल धानाची विक्री सदर शेतकरी करु शकतो. समजा त्याने पहिल्या वेळी कमी धान विक्री केली आणि पुन्हा धान विक्री करायला आल्यास विक्री मर्यादा अनुसार त्याला पुन्हा सातबारा आणून नोंदणी करण्याची गरज नाही. जर त्याने ३० क्विंटलपेक्षा जास्त धान विक्री साठी आणले व सातबाऱ्याची मर्यादा संपली तर त्याला गरज पडल्यास दुसऱ्या जमिनीच्या सातबारा उतारा आणून नोंदणी करावी लागेल. तसेच महत्वाचे आणि फायद्याचे म्हणजे यंदा ज्या शेतकऱ्यांनी सातबारा नोंदणी केली त्याला पुढच्यावर्षी त्या सातबाऱ्याची नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. नोंदणी झालेल्या सातबाऱ्याच्या मर्यादेनुसार ते आपला शेतमाल खरेदी केंद्रावर आणून विक्री करु शकतील. विपणन विभागाने धान खरेदी व सातबारा नोंदणीबद्दल एक मोबाईल अॅप तयार केला असून त्या अॅपनुसार मागील सर्व माहिती पुन्हा बघता येणार तसेच संबंधित शेतकऱ्याच्या नावे नोंद असलेली शेतजमीन किती याची सगळी माहिती प्राप्त होणार आहे.