सेंद्रिय शेती व स्वयंरोजगार प्रशिक्षण
By Admin | Updated: November 26, 2014 23:09 IST2014-11-26T23:09:31+5:302014-11-26T23:09:31+5:30
अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे शैक्षणिक विकास, ग्रामीण आरोग्य, शास्वत उपजिवीका व ग्रामीण संसाधन विकासावर आधारीत उपक्रम राबविले जात आहेत. यापैकी शास्वत उपजिवीका

सेंद्रिय शेती व स्वयंरोजगार प्रशिक्षण
गोंदिया : अदानी फाऊंडेशन तिरोडा तर्फे शैक्षणिक विकास, ग्रामीण आरोग्य, शास्वत उपजिवीका व ग्रामीण संसाधन विकासावर आधारीत उपक्रम राबविले जात आहेत. यापैकी शास्वत उपजिवीका या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उपजिवीकेत सुधार घडवून आणण्याच्या दृष्टीने सेंद्रिय शेती पद्धती व गाईच्या आधारे शेती कशाप्रकारे केली जाते या विषयाचे तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात एकूण ८५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यामध्ये ग्राम चिरेखनी येथील ३०, जमुनिया येथील २१ आणि खमारी येथील ३४ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणामध्ये उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सेंंद्रिय शेती, गाईच्या आधारे शेती, गांडुळ खत निर्मिती, कंपोस्ट खत निर्मिती, गाईचे शेण व गोमुत्रापासून तयार होणाऱ्या औषधी व वस्तु किटनियंत्रके प्रशिक्षण देणे हे होते.
सुनिल मानसिंघका समन्वयक गो-विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार यांनी देशी वंशाच्या गाईचे शेण व गोमुत्रापासून तयार होणाऱ्या विविध औषधी व वस्तु याविषयी माहिती तसेच सुबोधकुमार सिंग, समन्वयक अदानी फाऊंडेशन तिरोडा यांनी सेंद्रिय शेती पद्धती व गाईच्या आधारे स्वयंरोजगार कशाप्रकारे केला जातो. तसेच दिवाकर नेरकर गो-विज्ञान अनुसंधान केंद्र, देवलापार यांनी गाईचे आपल्या जीवनातील महत्व कचरे से कांचन तसेच सतीश राव झारखंड यांनी रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्यपरिणाम व जैविक शेतीची आवश्यकता या विषयी योग्य मार्गदर्शन सर्व प्रशिक्षणार्थ्यांना केले.
गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे गोमुत्र अर्क हे गुणकारी औषध तयार केले जाते. तसेच गोवंशावर आधारित विविध उत्पादने तयार केली जातात. एका गाईचे गोमुत्र दहा एकर जमिनीची फवारणी सहज करुन शकतो. जमिनीतील घज्ञतक विषद्रव्ये संपवून जमीन सजीव करण्याची क्षमता केवळ देशी वंशाच्या गायीच्या शेणात व गोमुत्रातच आहे. एक देशी वंशाची गाय प्रती दिवस ८ ते १० किलो शेण देते. गाईचे शेण व कचऱ्या पासून गांडूळ खत तयार करता येते. एका महिन्यामध्ये ५०० किलो गांडूळ खत तयार होते. बाजारामध्ये गांडूळ खताची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. म्हणजेच एका गाईच्या शेणापासून २५०० रुपयाचे उत्पन्न प्रत्येक महिन्याला मिळतो.
अदानी फाऊंडेशनचे स्वच्छता अभियानाकडे आर्थिक दृष्टीने पहाणे सुरु केले आहे. संपुर्ण सेंद्रिय कचऱ्यापासून उत्पन्न मिळविले जाऊ शकते. गावामध्ये मुख्यरुपात कचरा कृषी उत्पादन पशुपालन आणि स्वयंपाक घरातुन प्राप्त होतो. या कचऱ्यापासून गांडुळखत बनवून भरपुर प्रमाणात उत्पन्न घेता येते. हा प्रकल्प ५० गावांमध्ये राबविणार आहे.