सेवेतील दिरंगाईसाठी रेल्वेला भरपाईचे आदेश

By Admin | Updated: September 16, 2014 23:49 IST2014-09-16T23:49:30+5:302014-09-16T23:49:30+5:30

छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये पाणी, विद्युत व टीटीईची सुविधा उपलब्ध न करविल्यामुळे मध्यवर्ती रेल्वेला २० हजार रूपये नुकसानभरपाई व १० हजार रूपये तक्रार खर्चापायी देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक

The order for compensation to the Railways for delayed service | सेवेतील दिरंगाईसाठी रेल्वेला भरपाईचे आदेश

सेवेतील दिरंगाईसाठी रेल्वेला भरपाईचे आदेश

ग्राहक मंच : असुविधेसाठी फटका
गोंदिया : छत्तीसगड एक्सप्रेसमध्ये पाणी, विद्युत व टीटीईची सुविधा उपलब्ध न करविल्यामुळे मध्यवर्ती रेल्वेला २० हजार रूपये नुकसानभरपाई व १० हजार रूपये तक्रार खर्चापायी देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक संरक्षण मंचचे दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आयकर सल्लागार अ‍ॅड.सुधीर राठोड ३ नोव्हेंबर २०११ च्या सायंकाळी हबीबगंज (भोपाळ) स्थानकातून छत्तीसगड एक्सप्रेसच्या एस-११ मध्ये गोंदियाला येण्यासाठी बसले. यावेळी त्यांना बोगीत पाणी, विद्युत व टीटीई उपलब्ध नसल्याचे आढळले. पाणी, विद्युत व टीटीईविनाच प्रवास करीत असल्याची तक्रार त्यांचे सहप्रवाशीसुद्धा करीत होते. गाडी जेव्हा इटारसी स्थानकावर पोहोचली, तेव्हा राठोड यांनी इटारसीच्या प्लॅटफार्मवरील टीटीईला या प्रकाराची तोंडीच तक्रार केली. यावर ते म्हणाले की, पाणी व विद्युतची सोय नागपुरात होवू शकेल.
मात्र नागपूर स्थानक आल्यावरही कोचमधील विद्युत सुधारणा करण्यात आली नाही, तसेच पाणीसुद्धा भरण्यात आले नाही.
गोंदियात पोहोचताच राठोड यांनी ४ नोव्हेंबर २०११ रोजी लिखित तक्रार नोंदविली. मात्र रेल्वे विभागाकडून कसलेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण मंच गोंदियाकडे रेल्वे विभागाच्याविरूद्ध ग्राहक असुविधेसाठी मानसिक व शारीरिक छळ झाल्याची तक्रार २६ मार्च २०१३ रोजी केली. तसेच नुकसानभरपाईची मागणी केली.
राठोड यांनी माहितीच्या अधिकार अधिनियमांतर्गत रेल्वेकडून माहिती मागितली. त्यात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सदर तारखेला एस-१, २, ३, ७, ११ व १२ या डब्यांमध्ये टीटीई उपलब्ध करविण्यास रेल्वे विभाग असमर्थ असल्याचे दिसले. तसेच नागपूर स्थानकात एस-११ कोचमध्ये पाणी न भरण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्वीकार केले.
राठोड यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचे निरीक्षक व दोन्ही पक्षांचे मत ऐकल्यानंतर जिल्हा ग्राहक संरक्षण मंचचे अध्यक्ष अतुल आळसी व सदस्य वर्षा पाटील यांनी अ‍ॅड.राठोड यांनी तक्रार योग्य ठरविली. तसेच रेल्वे विभागाद्वारे ग्राहकांच्या सेवेत त्रृटी झाल्याने सेंट्रल रेल्वेला २० हजार रूपयांची नुकसानभरपाई १२ टक्के व्याजासह व तक्रार खर्चापायी १० हजार रूपये देण्याचे आदेश दिले.
तक्रारकर्ते राठोड यांनी आपला पक्ष स्वत: व अ‍ॅड. सुमीत राजनकर यांच्यामार्फत तर रेल्वेकडून अ‍ॅड. डी.जी. वडेकर यांनी पक्ष मांडला होता. (प्रतिनिधी)

Web Title: The order for compensation to the Railways for delayed service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.