शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन पार्सल उघडताय; व्हिडीओ रेकॉर्डिंग नक्की करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 15:51 IST

ग्राहकांनो सतर्क व्हा : ऑनलाइन खरेदी वाढल्याने फसवणुकीची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आता ऑनलाइन साहित्य खरेदी करताना सावधानता बाळगा, नाही तर आपल्याला गंडा बसू शकतो? ऑनलाइन वस्तू मागविताना व्हिडीओ रेकॉर्डिंग करूनच ऑनलाइन पार्सल उघडावे.

मोबाइलमध्ये असलेले विविध अॅप्स ऑनलाइन खरेदीचे दालन ग्राहकांपुढे उभे करीत आहेत; मात्र अशी खरेदी करताना ग्राहक म्हणून आपण अधिक सजग राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मागविण्यात आलेले पार्सल उघडताना त्याचा व्हिडीओ करणे गरजेचे आहे. जेणेकरून पार्सल उघडताना त्यात असलेल्या वस्तू डॅमेज असतील तर ते व्हिडीओमध्ये रेकॉर्ड होईल. ऑनलाइन शॉपिंगचा मोह आता सर्वांनाच जडला आहे. परिणामी, ऑनलाइन फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. अशात पार्सल उघडताना त्याचा व्हिडीओ तयार करणे विसरू नका.

जिल्ह्यात पार्सलमधून फसवणुकीची घटना नाही■ ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून साहित्य मागविण्याचा मोह आता सर्वांनाच जडला आहे. सुरक्षित आणि सजग राहून शॉपिंग केल्यास ऑनलाइन खरेदीचे फायदे जास्त असल्याचा अनुभव अनेक जण सांगतात.■ दुकानांमध्ये, मॉलमध्ये, होलसेल मार्केटमध्ये जाऊन एखादी वस्तू खरेदी करताना ग्राहक दहा वेळा विचार करून पारखून खरेदी करतात. परंतु ऑनलाइन ■ ■ खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होते. जिल्ह्यात आतापर्यंत घटना घडल्या असल्या तरी त्या पुढे आल्या नाहीत.

फसवणूक झालीच तर...■ ऑनलाइन खरेदी करताना आपण कोणत्या वेबसाइटवरून खरेदी करीत आहेत, याबाबत सतर्कता बाळगा.■ ऑनलाइन खरेदी करताना काही समस्या आल्यास त्यांच्या निवारणासाठी काही यंत्रणा आहे का, याची खात्री ग्राहकांनी करून घेणे. अत्यावश्यक आहे.■ विना खात्रीने ऑनलाइन खरेदी केल्यास त्याचा फटका ग्राहकांना बसतो. याची तक्रार जवळच्या पोलिस ठाण्यात करावी.

पार्सल फोडण्यापूर्वी ही घ्या काळजी■ ऑनलाइन पार्सल मागविताना शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा. त्यामुळे खरेदी करताना काही चूक झाल्यास आपण दिलेल्या रकमेचा घोळ होत नाही. ज्या कंपनीची वस्तू आपण खरेदी करणार आहात त्या कंपनीची ऑनलाइन खरेदीसंदर्भातील माहिती तपासून घ्यावी. त्यामुळे होणारी संभाव्य फसवणूक टाळली जाऊ शकते.

नागरिकांनी सतर्क राहावेसध्या विविध वेबसाईट ऑनलाइन विक्रीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. या वेबसाइट ई- कॉमर्सच्या नियमानुसार सुरू झाल्या आहेत. ऑर्डर केलेलेच साहित्य आले किवा नाही, हे आधी तपासून पाहणे आवश्यक आहे. - किरण रासकर, सायबर सेल प्रमुख, गोंदिया

टॅग्स :gondiya-acगोंदिया