शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

'ओपन जिम' निविदा प्रक्रियेत घोळ, गोंदियातील जिल्हा क्रीडाधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:30 IST

शालेय शिक्षण व क्रीडा उपसचिवांची कारवाई : ३ कोटी १९ लाख रुपयांची निविदा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने जिल्ह्यात ४६ ओपन जिम तयार करण्याकरिता ३ कोटी १९ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. मात्र या निविदा प्रक्रियेत जिल्हा क्रीडा नंदा खुरपुडे यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता ही प्रक्रिया परस्पर राबवून क्रीडा साहित्य खरेदी केले. याप्रकरणी शालेय शिक्षण व क्रीडा उपसचिव सुनील पांढरे यांनी जिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात ओपन जिमकरिता साहित्य खरेदीसाठी ३ कोटी १९ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. याअंतर्गत ओपन जिमकरिता लागणारे साहित्य खरेदीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार प्रक्रिया करून ती खरेदी करण्याची गरज होती. मात्र जिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे यांनी तसे न करता नियमांना डावलून क्रीडा साहित्य खरेदीची निविदा प्रक्रिया राबविली. तसेच परस्पर क्रीडा साहित्य खरेदीचे आदेश दिल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्याचे क्रीडा व युवक सेवा आयुक्त पुणे यांनी सादर केलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या नियम ४ अन्वये च्या तरतुदीनुसार शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करून या नियमाच्या नियम ४ च्या पोट नियम (१) च्या खंड (अ) नुसार जिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे यांना १३ मे २०२५ पासून पुढील आदेशापर्यंत निलंबित केले आहे. 

नंदा खुरपुडे यांचा कार्यकाळ वादग्रस्तचजिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे या बीड येथे कार्यरत असतानासुद्धा त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ हा सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिला आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली होती तक्रार

  • जिल्हा क्रीडा विभागाअंतर्गत व्यायाम शाळा बांधकाम प्रकरणाची पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तक्रार करण्यात आली होती.
  • त्यावेळी या व्यायामशाळा बांधकामाची निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. तेव्हा सुद्धा जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर
  • ओपन जिमच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याची तक्रार आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नयेजिल्हा क्रीडाधिकारी नंदा खुरपुडे यांनी निलंबनाच्या कालावधीत सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. त्यांना मुख्यालय सोडायचे असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया