भाजप प्रवेशाची केवळ अफवाच - अग्रवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:36 IST2019-06-05T21:36:00+5:302019-06-05T21:36:16+5:30
मागील काही दिवसांपासून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अफवा पसरविली जात आहे. यासंदर्भात तीन दिवसांपूर्वीच पार पडलेल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभेत आपण भाजप पक्षात प्रवेश करणार नसून काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण यानंतर पुन्हा काही वाहिन्यावर आपल्या भाजप प्रवेशाचे वृत्त दाखविले जात आहे.

भाजप प्रवेशाची केवळ अफवाच - अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील काही दिवसांपासून आपण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अफवा पसरविली जात आहे. यासंदर्भात तीन दिवसांपूर्वीच पार पडलेल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सभेत आपण भाजप पक्षात प्रवेश करणार नसून काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. पण यानंतर पुन्हा काही वाहिन्यावर आपल्या भाजप प्रवेशाचे वृत्त दाखविले जात आहे. यात काहीच तथ्य नसून ही केवळ अफवाच असल्याचे आ.गोपालदास अग्रवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे.
आपण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी अफवा पसरवून जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनोबल खच्चीकरण करण्याचे काम केले जात असल्याचा आरोपही अग्रवाल यांनी केला आहे. आपण भाजप पक्षात प्रवेश करणार नसून काँग्रेस पक्षातच राहून आपले विकास कार्य सुरू ठेवू असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.