शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

पालिकेकडे फक्त एकच ‘फॉगिंग मशीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 10:26 PM

शहरात स्वाईन फ्लु, स्क्रब टायफस व डेंग्यूचा प्रकोप वाढत असतानाच यावर रोकथाम करण्यासाठी नगर परिषदेकडे आवश्यक त्या सुविधांचा अभाव आहे. आजघडीला नगर परिषदेकडे शहरात फवारणी करण्यासाठी किटकनाशक नाही.

ठळक मुद्देशहरात आजारांचा उद्रेक : आता खरेदी करणार कीटकनाशक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरात स्वाईन फ्लु, स्क्रब टायफस व डेंग्यूचा प्रकोप वाढत असतानाच यावर रोकथाम करण्यासाठी नगर परिषदेकडे आवश्यक त्या सुविधांचा अभाव आहे. आजघडीला नगर परिषदेकडे शहरात फवारणी करण्यासाठी किटकनाशक नाही. तर फॉगिंग करण्यासाठी फक्त एकच मशीन असल्याची माहिती आहे. यावरून नगर परिषद शहरवासीयांच्या आरोग्याप्रती किती सजग आहे याची प्रचिती येते.दोन दिवसांपूर्वी शहरातील एका व्यक्तीचा स्क्रब टायफसने मृत्यू झाला असून डेंग्यूचेही रूग्ण आढळून येत आहेत. शिवाय स्वाईन फ्लुसह स्क्रबटायफस व डेंग्यूच्या रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे शहरवासीयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी शहराची सफाई व किटकनाशक फवारणी करण्याची गरज आहे. हिवताप विभागाकडून ग्रामीण भागात फवारणी करून आजारांची रोकथाम केली जाते. मात्र नगर परिषदेला शहरवासीयांच्या आरोग्याशी काहीच घेणे देणे नसल्याचे दिसते.कारण, आजघडीला नगर परिषदेकडे शहरात फवारणीसाठी किटकनाशक नसल्याची धक्कादायक माहिती आहे. नगर परिषद आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ तारखेलाच बीटीआय द्रव्य संपले. त्यामुळे आता आजारांचा उद्रेक वाढत असताना शहरात फवारणी करण्यासाठी नगर परिषदेकडे किटकनाशक नाही. प्राप्त माहितीनुसार, हिवताप विभागाकडून नगर परिषद स्वच्छता विभागाने हे द्रव्य आणले होते. यातून नगर परिषद आरोग्य विभाग व नगर परिषद प्रशासन किती तत्परतेने कार्य करीत आहे हे दिसून येते.एवढेच काय, शहरात फॉगिंग करण्यासाठी नगर परिषदेकडे एकच मशीन आहे. अशात शहरातील २१ प्रभागांत फॉगिंग करण्यातही नगर परिषद हतबल आहे. यावर हिवताप विभागाकडून तीन मशीन मागणार असल्याचे आरोग्य निरीक्षकांनी सांगीतले. एकंदर नगर परिषद आरोग्य विभागाचा कारभार हिवताप विभागाच्या भरवशावरच चालतो, हेच येथे म्हणावे लागणार आहे. हे सर्व घडत असताना मात्र नगर परिषदेत सर्वच आपापल्या धुंदीत असल्याचे बघावयास मिळते. २२सोमवारपासून फॉगिंग व फवारणीशहरातील स्थिती बघता सोमवारपासून (दि.१) शहरात फॉगिंग व फवारणी केली जाणार असल्याचे आरोग्य निरीक्षकांनी सांगीतले. यासाठी हिवताप विभागाकडून तीन फॉगिंग मशीन मागणार. तर सोमवारीच किटकनाशक खरेदी करणार असेही त्यांनी सांगीतले. विशेष म्हणजे, किटकनाशक खरेदीही थेट केली जाणार असल्याचे यातून दिसून येते. एकंदर नियमांची एैशीतैशी करून नगर परिषदेत अधिकारी व कर्मचारी आपला मनमर्जी कारभार चालवित असल्याचेही म्हणणे वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Healthआरोग्य