शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी फक्त १० दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:40 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढण्याची शेवटची मुदत ३१ जुलै आहे. मात्र शेतकरी सध्या रोवणीच्या कामात व्यस्त

एकूण शेतकरी २ लाख ३७ हजार : कमी वेळेत विमा काढणार कसा?लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढण्याची शेवटची मुदत ३१ जुलै आहे. मात्र शेतकरी सध्या रोवणीच्या कामात व्यस्त असल्याने केवळ दहा दिवसात पीक विमा काढायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.यंदा सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. ही घोषणा एैन खरीपाच्या तोंडावर केली. त्यातच कर्जमाफीच्या निकषांवरुन बराच घोळ निर्माण झाला होता. जुलै महिन्याला सुरुवात होऊन याबाबतचा संभ्रम दूर झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकामधून पीक कर्जाची उचल करण्यास विलंब झाला. पीक कर्जाची उचल, पीक विमा काढण्याची मुदत व रोवणीची कामे एकाच वेळी आल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्याचाच परिणाम पीक कर्जाची उचल आणि पीक विमा काढण्यावर झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ३७ हजार शेतकरी असून आत्तापर्यंत राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेतून २७ हजार शेतकऱ्यांनी ११८ कोटी रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली. तर तेवढ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने शेतकरी रोवणीच्या कामात व्यस्त आहेत. त्यातच पीक विमा काढण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाकविमा कंपनीकडून पीक विमा काढण्यासाठी पीेक पेरा प्रमाणपत्र, सातबारा, गाव नमुना आठ, आधारकार्ड ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय विमा काढता येत नाही. पीक पेरा प्रमाणपत्र हे तलाठी कार्यालयातून मिळते. पण, तिथे दोन तीन चकरा मारल्याशिवाय ते हाती पडत नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. कंपन्याकडून दिशाभूलपंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत गेल्यावर्षी जिल्ह्यातील ३७ हजार ७६७ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता. विमा हप्त्यापोटी १० कोटी रुपये विमा कंपनीकडे भरले. मात्र, गेल्यावर्षी नुकसान होऊनही केवळ ९८ शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरले. मुदतवाढ देण्याची मागणीजिल्ह्यात सध्या सर्वत्र रोणवीची कामे सुरू आहेत. याच कामात शेतकरी व्यस्त असून पीक विमा काढण्याची ३१ जुलैची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाला निवेदन दिले.सरासरी उत्पादन ठरविण्याची पध्दत बदलाविमा कंपन्या महसूल मंडळातील सरासरी उत्पादनावरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतात. यामुळे बरेच शेतकरी मदतीस अपात्र ठरतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सरासरी उत्पादन ठरविण्यासाठी गाव हा घटक विचारात घेण्याची गरज आहे. विमा कंपन्याप्रती रोषपीक विम्याच्या हप्त्यापोटी पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी विमा काढतात. मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून नुकसान झाल्यानंतरही विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याचे चित्र आहे.