अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्याला एक वर्षाची शिक्षा
By Admin | Updated: September 12, 2015 01:43 IST2015-09-12T01:43:41+5:302015-09-12T01:43:41+5:30
गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुनडीपार येथील आरोपी गुड्डू ऊर्फ सोमेश्वर कोमल येडे (२२) या तरूणाने ...

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्याला एक वर्षाची शिक्षा
गोंदिया : गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुनडीपार येथील आरोपी गुड्डू ऊर्फ सोमेश्वर कोमल येडे (२२) या तरूणाने अल्पवयीन मुलीशी लैंगिक छळ केल्याच्या आरोपात त्याला एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली.
गेल्या २५ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६.३० वाजतादरम्यान गावातीलच एका मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. पिडीत मुलगी आपल्या आठ वर्षाच्या मैत्रीणी सोबत रेशन दुकानातून घरी परतत असताना आरोपीने त्यांना आपल्या फर्निचर दुकानात बोलावून तिला १० रूपये देण्याचे आमिष देत तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला.
पिडीत मुलीच्या वडीलाच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिसांनी भादंविच्या कलम ३५४ अ सहकलम १० बाल लैंगिक अत्यार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर जिल्हा न्यायालयात शुक्रवारी सुनावणी करण्यात आली. जिल्हा न्यायाधिश प्रथम एस. आर. त्रिवेदी यांनी या प्रकरणावर सुनावणी केली. सरकारी वकील म्हणून कामकाज अॅड. सुजाता तिवारी यांनी काम पाहिले. कलम ३५४ अ अन्वये एक वर्षाची शिक्षा व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, कलम १० बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये एक वर्षाची शिक्षा व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. कोर्ट पैरवी महिला पोलीस हवालदार सुधा गणवीर यांनी केली.
न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात सीएमएससेलचे प्रभारी अधिकारी महेश महाले, मेश्राम व इतर कर्मच्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)