ट्रक अपघातात एक ठार, दोन जखमी
By Admin | Updated: April 10, 2016 01:59 IST2016-04-10T01:59:36+5:302016-04-10T01:59:36+5:30
येथील तहसील कार्यालयासमोरील राज्य मार्गावर गोंदियाकडून सांगलीकडे जाणारा १३ चाकी ट्रक रात्री २ वाजताच्या सुमारास उलटल्याने

ट्रक अपघातात एक ठार, दोन जखमी
मोहाडी : येथील तहसील कार्यालयासमोरील राज्य मार्गावर गोंदियाकडून सांगलीकडे जाणारा १३ चाकी ट्रक रात्री २ वाजताच्या सुमारास उलटल्याने ट्रकच्या ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला अपघातात दोन जण जखमी झाले.
गोंदियाकडून सांगलीकडे फलायवूड शिटा भरुन जाणारा ट्रक एम. पी.१७/२२६९ हा मध्यरात्री अंदाजे २ वाजताच्या सुमारास तोल गेल्याने तहसिल कार्यालयासमोर विजेच्या खांबावर पलटला विजेचा खांब भुईसपाट झाला व विजेचा तारा जमिनीवर कोसळल्या. मात्र वीज बंद झाल्याने पुढील हानी टळली.
ट्रकच्या चालकाचे डोके ट्रकच्या दरवाज्याला जोराने आढळल्यामुळे त्याचे डोके फुटून चालक देवेंद्रकुमार शिवपाल गोस्वामी (२०) रा. मोहपा, जिल्हा रिवा (मध्यप्रदेश) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा चालक रामानंद रामा यादव (५०) मु. इलाहाबाद व क्लीनर दिपक कुमार रामनरेश नामदेव (२०) हे किरकोळ जखमी झाले. याच ठिकाणी काही दिवसापूर्वी तांदळाचा कंटेनर उलटला होता. त्यात चालक गंभीर जखमी झाला होता. ठाणेदार जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)